“महाराष्ट्राची आजची राजकीय अवस्था दयनीय”; राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची खंत सांगितली….

| Updated on: Dec 28, 2022 | 8:51 PM

बाहेरील माणसं महाराष्ट्रात येऊन मोठी झाली पण राज्यातील माणसं निवांत आहेत. माझ्या महाराष्ट्रातील मराठी समाज गप्प का् आहे असा सवालही त्यांनी पुणेकरांना यावेळी केला.

महाराष्ट्राची आजची राजकीय अवस्था दयनीय; राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची खंत सांगितली....
Follow us on

पुणेः ज्या राज्यात बाहेरून लोकं येऊन मोठी झाली, त्यांनी नाव कमावलं, महाराष्ट्रात राहून राज्य निर्माण केली त्या माणसांना महाराष्ट्रा मोठा वाटतो पण आपल्याच लोकांना आपल्याच राज्याविषयी काय करू नये असं का वाटत असेल असा सवाल मनसेचे अध्यक्षांनी केला आहे. ते पुण्यातील आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी बोलत होते. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राजकारण वाईट नाही पण राज्यातील राजकारण नासवलं जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राज्यातील राजकारण चुकीच्या लोकांच्या, माणसांच्या हातात पडले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय संस्कृती बदलते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुसंस्कृत महाराष्ट्र जातीपातीत विभागला बरबाद होऊ लागला तर हे राज्य आपण कुठं घेऊन जाणारआहोत. या राज्यात बाहेरची लोकं येतात का येतात तर त्यांची राज्यं त्यांना नकोशी आहेत.

त्यामुळे अशी राज्याबाहेरून आलेली माणसं या महाराष्ट्रात येऊन मोठी झाली आहेत. यावेळी त्यांनी अभिनेता अभिताम बच्चन यांचे उदाहरण देत अमिताभ बच्चन जर अलाहाबादलाच राहिले असते तर त्यांचे काय झाले असते असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रातून गुजराती आणि मारवाडी निघून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल असा सवाल त्यांनी केला होता. पण राज्यपाल कोश्यारी यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या राज्यात काय झालं नाही म्हणून ते इथं महाराष्ट्रात आले आहे.

बाहेरील माणसं महाराष्ट्रात येऊन मोठी झाली पण राज्यातील माणसं निवांत आहेत. माझ्या महाराष्ट्रातील मराठी समाज गप्प का् आहे असा सवालही त्यांनी पुणेकरांना यावेळी केला.

कोणासाठी हे सहन करायचे आहे. त्यामुळे हेच आवाहन करण्यासाठी म्हणून मी पुण्यात आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शहराच्या विकासाविषयी सांगताना रस्ते प्रकल्प आणि रस्त्यांचा विकास काय गरजेचा आहे हेही त्यांनी सांगितले.