पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुकांसाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका घेतल्या आहेत. राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. याठिकाणी मोठं मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या वर्धापन दिनाकडे लागून आहे. या वर्धापन दिनी राज ठाकरे काय बोलणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मनसेचा वर्धापन दिन पुण्यात नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
मनसेचा वर्धापन दिन यंदा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा वर्धापन दिनानिमित्त मोठा सोहळा असतो. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापन दिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती. आता मनसेनं राज्यातील महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईसह मनसेनं यावेळी ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे पुण्यात होणारा मनसेचा वर्धापन दिन किती लाभदाई ठरतो, ते येत्या काळातच कळेल.
इतर बातम्या