पुणे : अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भरपूर पुस्तके (Books) खरेदी केली आहेत. या पुस्तक खरेदीला जातानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जगू द्या, असे यावेळी ते माध्यमांना बोलल्याचेही सर्वत्र व्हायरल (Viral) झाले आहे. यादरम्यान राज ठाकरे यांनी 200हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी अक्षरधारा बुक गॅलरीतून तब्बल 50 हजारांची पुस्तके खरेदी केली आहेत. विविध विषयांवरील तब्बल 200हून अधिक पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.
गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्यूंजय या पुस्तकाची नवी आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत. पुस्तके खरेदी करत असताना राज ठाकरे यावेळी थांबलेले असताना अनेक महिला तसेच नागरिक त्यांच्या जवळ येत होते, स्वाक्षरी मागत होते. त्यांचे प्रेम पाहून राज ठाकरे यांनीही त्यांना वेळ दिला. त्यांना नमस्कार करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. काहींना त्यांनी स्वाक्षरीही दिली.
राज ठाकरे हे अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी आले असता, तिथे अनेक माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कॅमेऱ्यावर फोकसही लावण्यात आला होता. मात्र, त्याचा त्रास जाणवू लागल्याने राज यांनी ते बंद करायला लावले. त्यावेळी थोडे पुढे येत काय जगू द्याल की नाही? बंद कर ते.. वेगळे सांगू का सगळ्यांना? असे राज ठाकरे म्हणाले. त्यांचा संताप यावेळी पाहायला मिळाला.