Raj Thackeray : राज ठाकरे पुरग्रस्तांच्या भेटीला, पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांच्या जाणून घेतल्या अडचणी

| Updated on: Aug 04, 2024 | 12:23 PM

Raj Thackeray in Pune : पुण्याला मुसळधार पावसाने झटका दिला. धरणाचे पाणी सोडल्याने पुण्यातील एकतानगरसह अनेक भागात पाणी शिरले होते. त्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले. काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज राज ठाकरे पुण्यात पोहचले आहेत. त्यांनी पुरग्रस्तांच्या अचडणी जाणून घेतल्या.

Raj Thackeray : राज ठाकरे पुरग्रस्तांच्या भेटीला, पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांच्या जाणून घेतल्या अडचणी
राज ठाकरे पुरग्रस्तांच्या भेटीला
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातील राजनगरमध्ये दाखल झाले आहेत. या भागाला नुकताच पुराचा फटका बसला होता. पुण्यासह परिसराला पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यात पुण्यातील एकतानगरसह अनेक रहिवाशी भागात पाणी शिरले. त्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर या भागातील मृतांना तातडीने मदत जाहीर झाली होती. आज राज ठाकरे एकतानगर भागात पुरग्रस्तांच्या भेटीला आले. त्यांनी यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाचा जोर वाढला, पुन्हा पूर भीती

पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे धरणातून पावसाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी शिरण्याची भीती आहे. आजही काही भागांना पुराचा फटका बसू शकतो. त्यादृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सकाळपासूनच सुरु आहे. त्यात वाहनांचे आणि घरातील सामानाचे पुन्हा नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांनी साधला नागरिकांशी संवाद

यावेळी एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. एकतानगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांना प्रशासन मदत करत आहे की नाही याची माहिती घेतली. पाणी शिरल्याने त्यांना किती नुकसान झाले, याची माहिती घेतली. नागरिकांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडली. कोणत्या अडचणी आल्या याची माहिती दिली. यावेळी नागरिकांनी प्रशासनावरील रोष पण व्यक्त केला.

काय म्हणाले राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी शनिवारी मुख्यमंत्री घेतलेल्या भेटीची माहिती राज ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना दिली. पूरग्रस्तांच्या अडचणींवर चर्चा झाल्याचे माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे दोन तरुण विजेच्या धक्क्याने मृत पावली, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा धनादेश तात्काळ मंजूर केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. हा धनादेश आज जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांशी कोण-कोणत्या विषयावर चर्चा झाली याची सविस्तर माहिती यावेळी राज ठाकरे यांनी येथील नागरिकांना भेटून दिली. तीन लाख परिसर असलेल्या एकतानगर परिसराला पूराचा फटका बसू नये यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तर सर्व परिसराचा पूनर्विकास करण्याबाबतची माहिती दिली. तर मयत दोन तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांचा धनादेश मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.