पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 16 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात थोड्याच वेळात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडणार आहे. राज ठाकरे आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असून ते महापालिका निवडणुका जिंकण्याच्या निर्धारानं लढाव्यात अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना देतील. राज ठाकरे चार दिवसांपासून पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते देखील आजच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. अमित ठाकरे देखील आजच्या सोहळ्याला उपस्थित असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात वर्धापन दिन सोहळ्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनसेच्या वतीनं पुण्यात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फलक लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित केला जाणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मनसेचा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. लढायचं ते जिंकण्यासाठी हा मंत्र राज ठाकरे मनसे सैनिकांना देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे संभाव्य भाजपसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे बोलतील. ओबीसी राजकीय आरक्षण, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारचा कारभार याबाबत राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागलंय.
राज ठाकरे यांच्या भाषणा अगोदर माझे गाणे अक्षय गाणे या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
१६ वर्षं…
लढा नवनिर्माणाचा!
लढा मराठी अस्मितेचा!
लढा महाराष्ट्र धर्माचा!
लढा भगव्याचा!लढा तुमचा, आमचा, महाराष्ट्र सैनिकांचा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम महाराष्ट्र सैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!#मनसे_वर्धापन_दिन #चला_पुणे #MNSAdhikrut pic.twitter.com/S9NvfNlQDf
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा आतापर्यंत मुंबईत होत होता. मात्र , राज ठाकरे यांनी यावर्षी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यात जोरदार तयारी सुरु केली होती. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात नियमितपणे पुण्याचे दौरे केले होते. 7 मार्चपासून राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या :
फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!
चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?