पुणे: पुणे (Pune) महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलीय. राज ठाकरे यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीच्या अधिक लक्ष घातलं आहे. राज ठाकरे आता पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतील. 7 मार्च ते 10 मार्च या दरम्यान राज ठाकरे पुण्यात असतील. राज ठाकरे या दौऱ्यात मनसेचे कार्यक्रम, मनसेचा वर्धापन दिन, पिंपरी चिंचवड दौरा या कार्यक्रमांना उपस्थित असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला असतो. यावर्षी पहिल्यांदा मुंबईबाहेर वर्धापन दिन सोहळा होणार आहे.
राज ठाकरे 7 ते 10 तारखेपर्यंत पुण्याचा दौरा करणार आहेत. 8 तारखेला राज ठाकरे पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मनसेचा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला असतो. पुण्यात वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. त्याला राज ठाकरे मार्गदर्शन करतील. तर, 10 मार्चला राज ठाकरे पिंपरी चिंचवडचा दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवस पुण्यात तळ ठोकणार असून त्यांचं पुणे महापालिका निवडणूक हे लक्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मनसेचा वर्धापनदिन यावेळी पुण्यात होणार असल्याची माहिती आहे. 9 मार्चला मनसेचा वर्धापनदिन सोहळा असतो. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती. आता मनसेनं राज्यातील महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईसह मनसेनं यावेळी ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलंय.
इतर बातम्या :
Big Breaking झेलेन्स्की युक्रेन सोडून पळाल्याचा रशियन मीडियाचा दावा, दाव्यात किती तथ्य?
Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा