पुणे : पर्यटकांची प्राणीसंग्रहालयाला (Zoo) भेट देण्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. उद्यापासून (20 मार्च) पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research, Katraj) पर्यटकांसाठी सुरू होणार आहे. 2 वर्ष 5 दिवसांनी अखेर प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी (Tourist) खुले होत आहे. दोन डोस घेतलेले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून सगळी तयारी पूर्ण झाली आहे. मागील अनेक महिन्यांपासून पर्यटक याची वाट पाहत होते. आता पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून उद्यापासून प्राणीसंग्रहालय सुरळीत सुरू होणार आहे. खुले होणारे प्राणीसंग्रहालय अधिक वेगळ्या आणि चांगल्या अनुभवाचे असणार आहे. नवे प्राणी, त्यांच्यासाठी नवे खंदक तसेच इतर सुविधांनी युक्त असा अनुभव पर्यटक घेणार आहेत. पर्यटकांना नवा अनुभव आता घेता येणार आहे.
प्राणीसंग्रहालयात आता बीग कॅट यामध्ये बिबट्या त्याचबरोबर शेकरू, तरस, चौशिंगा आदी प्राणी असणार आहेत. याआधी काही कारणास्तव या प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना होत नव्हते. ते आता होणार आहे. कोरोनाकाळात पर्यटकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. आता प्राणिसंग्रहालय खुले होणार आहे. तर आगामी सुट्ट्यांचा मौसम लक्षात घेता प्राणीसंग्रहालयालाही उत्पन्न वाढवण्याची संधी आहे.
वाघ, सिंह, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती तर चौशिंगा, तरस आदी विविध प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तर आगामी काळात झेब्रा आणि इतर काही प्राणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. प्राणीसंग्रहालय बंद होते, त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले आहेत. विविध विकासकामेही झाली आहेत. अजून काही बाकी आहेत, तीही केली जाणार आहेत. पाहा व्हिडिओ –