कोल्हापूर: शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.
राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.
केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलंय. भाजपनेच एफआरपीचे तुकडे करण्याचं अनौरस बाळ जन्माला घातलंय. आम्ही ते खपवून घेणार नाही. आज पुण्यात भाजपच एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन झालं. पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल, असं सांगतानाच स्वाभिमानी कोरोना नियमांचं पालन करून आंदोलन करते. स्वाभिमानी संघटना झोपली असा गैरसमज कुणीही करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
15 सप्टेंबरपासून कारखाने सुरू करायला मंत्री समितीने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी स्वाभिमानीच्या ऊस परिषदे शिवाय पश्चिम महाराष्ट्रात कारखाने सुरू होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कधी नव्हे ते साखर उद्योगाला चांगलं वातावरण आहे. ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीचा निर्णय प्रोत्साहन देणारा आहे. आता कारखानादारांना कोणतीही ओरड करता येणार नाही. त्यांनी आता कोणतीही सबब सांगू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 September 2021 https://t.co/TRbOrEU9Kh #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
संबंधित बातम्या:
Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
(raju shetti slams central and maharashtra government over farmers frp)