पुणे – लग्नाचे आमिष दाखवत 24 वर्षीय तरुणी सोबत शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक (ShivSena Raghunath Babanrao Kuchik) याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा(Rape case) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस सस्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील(Modal colony) प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीबाबत माजी सरपंच म्हणतात…
भारतीय हवाई दलात अप्रेंटिसच्या 80 जागांवर भरती, नाशिकमध्ये काम करण्याची संधी