पुणे : भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) हे हुकलेले आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते रवीकांत वरपे यांनी केला आहे. तुषार भोसले यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. रवीकांत वरपे म्हणाले, की अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आण-बाण-शान आहेत. भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आपले खरे आडनाव एकदा महाराष्ट्राला सांगावे. भोसले हे आडनाव लावून मर्दपणा किंवा शाही बाणा अंगात येत नाही. तुमचे खरे आडनाव आम्हाला माहिती आहे. एकदा तुम्ही तुमच्या तोंडून संपूर्ण महाराष्ट्राला तुमचे खरे आडनाव सांगावे. त्यामुळे तुम्ही तुषार भोसले नसून तुषार हुकलेले आहात, असा हल्लाबोल रवीकांत वरपेंनी (Ravikant Varpe) केला आहे.
भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले हे हुकलेले…@NCPspeaks @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @AcharyaBhosale @TV9Marathi @abpmajhatv @saamTVnews @JaiMaharashtraN @news_lokshahi @SarkarnamaNews @3kmIndia @thodkyaat @mumbaitak @PoliticalMH @hwnewsmarathi @News18lokmat pic.twitter.com/H0L3YNJJ9I
हे सुद्धा वाचा— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 12, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देहूतील कार्यक्रमात बोलू दिले नाही, म्हणून राष्ट्रवादीने आकांडतांडव केला होता. आता किमान स्वतःच्या पक्षात तरी अजित पवार यांचा मानसन्मान ठेवायचा होता, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि आता विरोधीपक्ष नेतेपदी असलेल्या अजितदादांचा राष्ट्रवादीने दिल्लीला बोलावून अपमान केला. एकीकडे माननीय पंतप्रधानांनी स्वत: आग्रह करूनही त्यांनी भाषण केले नाही, म्हणून आकांडतांडव करणाऱ्या आणि नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलूसुद्धा दिले नाही. आधी स्वत:च्या पक्षात तरी मानसन्मान ठेवा आणि मग दुसऱ्यांना अक्कल शिकवा, असे ते म्हणाले होते.
राष्ट्रवादीची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. यावेळी कार्यक्रमादरम्यान अजित पवार मध्येच उठून गेले होते. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर स्वत: अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिले होते. राष्ट्रीय पातळीवरीन नेत्यांनाच बोलू द्यायचे हा हेतू होता, त्यात नाराज असण्याचे कोणतेही कारण नव्हते, असे अजित पवार म्हणाले होते.