राज्य शासनाच्या तिजोरीत ‘इतक्या’ कोटींचा महसूल जमा; जानेवारीत 2 लाखांहून अधिक दस्तांची नोंद

| Updated on: Feb 21, 2022 | 1:54 PM

आतापर्यंत राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे 19 लाख 11 हजार दस्तांची नोंदणी झाली आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्‍ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते.

राज्य शासनाच्या तिजोरीत इतक्या कोटींचा महसूल जमा; जानेवारीत 2 लाखांहून अधिक दस्तांची नोंद
revenu
Follow us on

पुणे – कोरोनाचे (corona) सावट कमी होताच आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यानुसार नागरिकांनी घरांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. याच सदनिकांच्या जागेच्या दस्त नोंदणीतून राज्य शासनाच्या तिजोरीत 24 हजार 606 कोटींचा महसूल जमा झाला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 हे संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे महसुलात(Revenue )आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे (State Registration and Stamp Duty Department)19 लाख 11 हजार दस्तांची नोंदणी झाली आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्‍ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. यामुळे राज्याच्या महसूलात चांगलीच भर पडली आहे.

जानेवारी  2 लाख 10 हजार दस्त नोंदणी

एप्रिल 2021 – 1 लाख 72 हजार दस्तांची नोंद – 845 कोटींचा महसूल

जुलै 2021 –  1 लाख 69 हजार दस्तांची नोंद- 2 हजार 411 कोटींचा महसूल

ऑक्‍टोबरमध्ये 2021- 1 लाख 88 हजार दस्तांची नोंद-  3 हजार 200 कोटी,

डिसेंबरमध्ये 2021 – 2 लाख 44 हजार दस्तांची नोंद   3 हजार 700 कोटींचा महसूल

जानेवारी 2022 मध्ये 2 लाख 10 हजार दस्तांची नोंद  2 हजार 817 कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.

विकासकामांसाठी निधी

शासनाकडून विविध मोठे प्रकल्प हाती घेतले जातात. रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो प्रकल्प आदींबरोबर विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहे. या कामांसाठी शासनालाही मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्‍यकता असते. शासनाकडे जमा होणारा हा महसूल विविध विकास कामांवर खर्च केला जातो. जमा होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा याचा निर्णय होत असतो. त्यामुळे नोंदणी विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलाकडे शासनाचे लक्ष असते.

Kirit Somayya | ईडीकडे तक्रार कशी करायची असते? किरीट सोमय्यांनी घेतली राऊतांची शाळा!

नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी फिस्कटली; काँग्रेस प्रभारींनी काय दिले आदेश?

Wriddhiman Saha: ऋद्धीमान साहाच्या आरोपावर राहुल द्रविड यांनी सोडलं मौन, म्हणाले…