Dhananjay Munde Case | माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता: रोहित पवार

| Updated on: Jan 15, 2021 | 8:00 PM

धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडलीय, माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar Dhanajay Munde)

Dhananjay Munde Case | माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता: रोहित पवार
रोहित पवार धनंजय मुंडे
Follow us on

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज बारामती येथील पिंपळी लिमटेक येथे मतदान केले. मतदानानंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवार यांनी भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले हा व्यक्तीगत विषय आहे. पोलीस याबद्दल तपास करत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, हा काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे पुढे येतय, असं रोहित पवार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडलीय, माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, असं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar comment on Dhananjay Munde Case)

रोहित पवार काय म्हणाले?

गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांबद्दल पोलीस तपास करत आहेत. तपास होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलींगचा प्रकार असल्याचे पुढे येतय.शेवटी पोलीस तपासात सर्व गोष्टी पुढे आल्यानंतर याबद्दल पक्ष आणि स्वत: धनंजय मुंडे याबद्दल निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांनी स्वत: याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सत्य परिस्थिती त्यांनी लोकांसमोर मांडली. माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, अशा व्यक्तीविरोधात षडयंत्र होत असेल तर त्याबद्दल खोलात जाण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

माजी मंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणूक गांभीर्यानं घेतली

कर्जत जामखेडमधील 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. माजी मंत्री राम शिंदे यांनी ही निवडणुक गांभीर्याने घेतलीय. 90 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होत आहे. उर्वरीत ग्रामपंचायतींमध्ये भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्यानं काही प्रमाणात चुरस निर्माण झालीय. काही ग्रामपंचायतीमध्ये 20-20 वर्षे भाजप सत्तेत होते पण कामे झाली नाहीत त्या ठिकाणी खरी चुरस आहे. सर्वच ठिकाणी कामे करायचीत, कोणताही दबाव न येता निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रशासनाला सुचना दिल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील प्रश्न सोडवण्यास महाविकास आघाडी सक्षम

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरीकांना आता बदल हवा आहे. मी त्या भागात फिरलो असून अनेकांशी चर्चा केली त्यावेळी लोकांनी बदल व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. तेथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम असून नवी मुंबई महापालिकेत परिवर्तन होईल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे. त्यानुसार याबद्दल जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.


संबंधित बातम्या:

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

धनंजय मुंडेंच्या ‘संबंधावर’ पंकजा मुंडे काय बोलणार ?

(Rohit Pawar comment on Dhananjay Munde Case)