पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या झालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्याच साथीदाराने त्याला प्लॅन करून संपवलं. पुण्यातील कोथरूड परिसरातच त्याला मारण्याात आलं. गुंड शरद मोहोळ याच्या हत्येची राज्यभर चर्चा होत आहे. शरद मोहोळ याच्या हत्येवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरात ज्या दिवशी असता तिथे उघड घड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत. आज सर्वात खराब पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यावर कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त गृहमंत्रीपद पाहावं आणि तिथे तरी न्याय द्यावा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
जर होम मिनिस्टर म्हणून त्यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा. ते काय करतात त्यावर त्यांनी जास्त बोलावं. दुसऱ्यांच्या गोष्टींवर जास्त बोलू नये असं मला वाटत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याची हत्या झाल्यावर देवेंद्र फडणवीस पुणे शहरातच होते. शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया देताना, टोळी युद्ध काही नाही मोहोळ याला त्याच्याच साथीदाराने मारलं असल्याचं सांगितलं होतं.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याला त्याचाच साथादीर मुन्ना उर्फे साहिल पोळेकर याने आपल्या साथीदारांसह गोळ्या घातल्या. साहिल याने एकदम फुल प्रुफ प्लॅन करत मोहोळला संपवलं. दोन साथीदारांना आधीच बाहेर दबा धरून लावायला लावला होता. मोहोळच्या लग्नाचा वाढदिवसाचं घरी जेवला आणि बाहेर येताच संधी साधून त्याला 5 जानेवारी 2024 ला गोळ्या मारत त्याची हत्या केली. शरद मोहोळ याची त्याच्या कोथरूडमधील सुतारदरा परिसरातच हत्या करण्यात आली.