पुणे : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खैबरखिंडीतून आर्य आले, हे लिहिणारे तुमचेच लोक खोटारडे आहेत, हे जाहीर करा. फडणवीसजी तुम्ही सगळ्यांचा डीएनए एकच सांगत असाल, तर स्वतःला आदिवासी आणि दलित म्हणून जाहीर करा, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. भारतातला सगळ्यात प्रीव्हीटीव्ह ट्रायब म्हणून जे अंदमानचे आदिवासी आहेत, ते असतील, बंगालमध्ये राहणारे ब्राम्हण असतील, साऊथमध्ये राहणारे नायर असतील किंवा उत्तर प्रदेशात राहणारे ज्यांना आपण दलीत समाजाचे म्हटले आहे, ते असतील. या सगळ्यांचा डीएनए (DNA) एकच निघाला. हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, असे वक्तव्य भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यावर सचिन खरात यांनी टीका केली आहे. सर्वांचा डीएनए एकच असेल तर फडणवीसांनी स्वत:ला दलित घोषित करावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
खरात म्हणाले, की नवीन डीएनएचा शोध लावणारे वैज्ञानिक देवेंद्र फडणवीसजी हे आदिवासी, दलित, नायर आणि ब्राह्मण हे एकाच डीएनएचे आहेत असे सांगून ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत. मग एकाच जातीच्या लोकांना शिक्षण अधिकार होता. त्याच जातीच्या लोकांनी आर्य खैबरखिंडीतून आले हा इतिहास पुराव्यानिशी मांडला. ते सर्व खोटारडे होते हे जाहीर करा.
#Pune : सगळ्यांचा डीएनए एकच तर मग देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला आदिवासी, दलित म्हणून जाहीर करावं, असं आव्हान रिपाइं (खरात)चे सचिन खरात यांनी केलं.@Dev_Fadnavis #Devendrafadnavis #sachinkharat #DNA #Pune
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/HTix8hsJdv— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2022
पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दीपस्तंभ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे वक्तव्य करत आर्य आणि द्रविड संघर्षावर सडकून टीका केली होती. तसेच ही थेअरीच पूर्ण चुकीची असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे म्हणत हे सर्व एका बापाची औलाद असल्याचे म्हटले होते.