पुणे : महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) वारंवार सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तवे करत आहे. आता राज ठाकरे हे औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा घेणार आहेत. परंतु औरंगाबाद क्रांतीभूमी आणि नामांतर भूमी आहे. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदयाने राहतात. त्यामुळे धर्माच्या नावाखाली राजकारण (Politics) करणाऱ्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राज्य सरकारला करत आहे, असे रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात म्हणाले आहेत. मशिदींवरील भोंगे हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय असल्याचे राज ठाकरे पुण्यात म्हणाले होते.
येत्या 1 मे रोजी आपली औरंगबादमध्ये सभा होईल. त्यानंतर 5 जून रोजी आपण अयोध्येला जाणार आहोत, अशी महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल केली. त्यांनी पुण्यात यांनी एक पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. हिंदुत्वाच्या भूमिकेवर स्वार घेतल्यानंतर राज यांनी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केलीय. कारण औरंगाबादच्या कोणत्याही निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोच. आता राज महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभेची घोषणा केलीय.
#Pune : धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या सचिन खरात यांनी केलीय.#RajThackeray #Aurangabad #sachinkharat #Pune
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRyeJh9 pic.twitter.com/v6jRSqPWdj— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2022
आणखी वाचा :