गौतमी पाटील कोण? पावसाळ्यात छत्री उगवतात तशी… कुणी केली गौतमी हिच्यावर खोचक टीका?

| Updated on: Mar 24, 2023 | 11:00 AM

मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. पावसाळ्यात छत्री उगवते तशी गौतमी पाटील आहे. अशा लय गौतमी पाटील आहेत, अशी टीका संभाजीराजे जाधव पाटील यांनी केली आहे.

गौतमी पाटील कोण? पावसाळ्यात छत्री उगवतात तशी... कुणी केली गौतमी हिच्यावर खोचक टीका?
gautami patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अजूनही टीका होताना दिसत आहे. अनेकांनी गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर गौतमी पाटीलने माफीही मागितीली होती. आपल्या नृत्यात आपण बदल केल्याचं गौतमी पाटीलने म्हटलं होतं. मात्र, त्यानंतरही तिच्यावर अधूनमधून टीका होताना दिसत आहे. मराटी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव-पाटील यांनी आता गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. गौतमी पाटील ही पावसाळ्यात छत्री उगवते तशी आहे. काही महिने चालेल त्यानंतर ती दिसणारही नाही, असं संभाजीराजे जाधव पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. गावागावात जशी पावसाळ्यात छत्री उगवते तशी गौतमी पाटील आहे. अशा लय गौतमी पाटील आल्या. पण चिरतरूण असणारा तमाशा कायम आहे. विठ्ठलाला भेटायला जसं लोक पंढरपूरला जातात. तसेच तमाशा पंढरी नारायणगावात लोक येतात. कलेची ही जुनी परंपरा आहे. गौतमी पाटील ही हंगामी आहे. गावात छत्री उगवते तशी आहे, असं संभाजीराजे जाधव पाटील यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तुलनाच करू शकत नाही

गौतमी पाटील गावात मुलं आहेत म्हणायची आता आहेत कार्टी . ज्या उदरातून जन्म घेतला तिथे हात केला म्हणजे गौतमी पाटील मोठी झाली का? तिच्याकडे कोणती कला आहे? ती आमच्या तमाशातील बाईबरोबर नाचू शकते का? आमची तमाशातील बाई नऊवारी साडी चापूनचोपून नेसलेली असते. गावगावाड्यातील शेतकरी जगवण्याचं काम आम्ही कलाकारांनी केलं आहे. गौतमी पाटील कोण आहे? महिनाभर गौतमी पाटील चालेल. नंतर ती कोणत्या गावात जाईल सांगता येत नाही. आमच्या कलावंतांनी लोकांना जगण्याची उमेद दिली. त्यांना जगवण्याची उमेद दिली. त्यांच्याशी कुणी तुलनाच करू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बिदागी मिळते, पण काहीच उरत नाही

अक्षय तृतीया, काल आष्टमी पर्यंत म्हणजे 1 ते 20 तारखेपर्यंत तमाशाचं बुकींग फुल आहे. दीड लाख ते तीन लाखापर्यंत तमाशाचं बुकींग सुरू आहे. 10 कोटींची उलाढाल अगोदर झालेली आहे. आता 15 ते 20 कोटीची होईल. खर्च भयानक आहे. महागाई आहे. बिदागी मिळते पण सर्व खर्चवारी जाते. त्यामुळे तमाशा मालकाला काहीच उरत नाही, असं त्यांनी सांगितलं. तमाशाच्या कार्यक्रमात केव्हाही खंडन पडणार नसून नारायणगाव येथील राहुट्यांवर गावकरी हे बुकिंगसाठी येणारच असंही त्यांनी सांगितलं.