पुणे : समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार (Samruddha Jeevan Mahesh Motewar) यांने दगडुशेठ हलवाई गणपतीला अपर्ण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार ‘सीआयडी’कडून जप्त करण्यात आलाय. या हाराची किंमत तब्बल 58 ते 60 लाख रुपये इतकी असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार “सीआयडी’कडे सुपुर्द करण्यात आला आहे. (Samruddha Jeevan Mahesh Motewar Gold Necklace Dagdusheth Ganpati Seized CID)
राज्याच्या विविध भागांमध्ये शेळीपालन तसंच शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवून मोतेवारने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्या याच कारनाम्यामुळे राज्याच्या विविध भागांत त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. महेश मोतेवार सध्या ओरिसा कारागृहात आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे.
महेश मोतेवारने केलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. त्याने गुंतवणूकदारांना फसवून कुठेकुठे पैशांची गुंतवणूक केली, याचा शोध घेणं सध्या सुरु आहे. याच दरम्यान आम्हाला एक फोटो सापडला ज्यामध्ये त्याने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला एक सोन्याचा हार अर्पण केल्याचं दिसत होतं. त्यानुसार हा हार आज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.
मोतेवारने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला अर्पण केलेला सोन्याचा हार शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून हा हार खरेदी केला होता, असंही अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.
(Samruddha Jeevan Mahesh Motewar Gold Necklace Dagdusheth Ganpati Seized CID)
हे ही वाचा :