‘मनोज जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत’; पाहा कोणी केला गंभीर आरोप

| Updated on: Feb 27, 2024 | 3:28 PM

मराठा आरक्षणाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्यातीलच काही आंदोलक गंभीर आरोप करू लागलेत. आज परत एकदा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप झाले असून आता जाहीरपणे शरद पवार आणि रोहित पवार या आंदोलनासाठी मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनोज जरांगेंना शरद पवार आणि  रोहित पवार यांच्याकडून मदत; पाहा कोणी केला गंभीर आरोप
Follow us on

अभिजीत पोते, पुणे | मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सागर बंगल्यावर येत आहे, मला  मारण्यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनामध्ये फूट पडलेली दिसली, अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच संगीता वानखेडे यांनी जरांगे यांची SIT चौकशीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचं नाव घेत खळबजनक वक्तव्य केलं आहे.

मी SIT चौकशी करा हीच मागणी करत होते. अनेक राजकीय नेत्याचा जरांगे पाटील यांना सपोर्ट आहे. जरांगे पाटलाची चौकशी झाल्यावर सगळं दूध कमी पाणी का पाणी होईल. शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा म्हणत जरांगेचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे, गरज पडल्यास माझे देखील चौकशी करा, असं संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाची दिशाभूल जरांगे यांनी केली असन आरक्षणात फसवणूक केली आहे. जाणून बुजून माझी बदनामी केली जाते, सगेसोयरे मान्य होणार नाही आम्हाला तसं आरक्षण नको. येत्या निवडणूकित जरांगे याला त्याची माणसे निवडून आणायची आहेत. गावागावातून पैसे गोळा होत आहेत. गाड्या कुठून आल्या याची चौकशी करा. आमच्या समाजाच वाटोळं केलं असून आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होत असल्याचं वानखेडे म्हणाल्या.

दरम्यान, विधीमंडळाच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर राजेश टोपे यांच्य कारखान्यामध्ये आंदोलनाचं षडयंत्र रचलं गेल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे.