सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी (Mahavikas Aghadi Supporters Violate Corona Rules) प्रचंड गर्दी महापालिकेसमोर केली होती. कोरोनाच्या परिस्थितीवर प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. असे असताना राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महापौरांची निवडीच्या निमित्ताने नियमांच्या उल्लंघन केलं असताना सांगली पोलीस यावर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत चौकशी करण्याचे स्पष्ट केले आहे (Mahavikas Aghadi Supporters Violate Corona Rules).
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कोरोना नियमांची अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात सभा जत्रा, यात्रा, रॅली यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रशासनाकडून उत्पादनाच्या बाबतीत धडक कारवाई सुरु आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये तर खुद्द महापालिकेचे आयुक्त रस्त्यावर उतरुन मास्क आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करत आहे.
तर दोन दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान मधील निलंबित करण्यात आलेल्या नितीन चौगुले यांनी शिवभक्तांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यादरम्यान गर्दी जमवल्या प्रकरणी नितीन चौगुले यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. असे असताना सांगली महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीच्या निमित्ताने मंगळवारी निवडीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर प्रचंड गर्दी केली होती.
कार्यकर्त्यांनी यावेळी मोटर सायकल रॅली काढत फटाक्यांची आतिषबाजी करुन प्रचंड गर्दी महापालिकेसमोर जमवली होती. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या समोर आणि सांगली महापालिका कार्यालयाच्या आवारात घडला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांवर कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे (Mahavikas Aghadi Supporter Violate Corona Rules).
याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना विचारला असता जिल्ह्यामध्ये कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे या निवडीच्या वेळी जर असा प्रकार झाला असेल तर त्या बाबत चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
“संजय राठोड यांनी गर्दी जमवून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय, कार्यकर्त्यांवर नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा”https://t.co/7C9dUTyWia@cbawankule @SanjayDRathods @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
Mahavikas Aghadi Supporters Violate Corona Rules
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….
पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी : मुख्यमंत्री
संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, पोहरादेवी गर्दीवर शिवसेनेचं पहिलं भाष्य