सांगली : सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत सांगलीच्या (Mane Husband And Wife) कवठेपिरान ग्रामपंचायतीचा कारभार एका पती-पत्नीच्या ताब्यात गेला आहे. घराचा कारभार पाहणारी पत्नी सरपंच तर, तर सरपंच पत्नीच्या पतीची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता माने दाम्पत्य मिळून गावाचा कारभार पाहणार आहेत (Mane Husband And Wife).
सांगली जिल्ह्यातील सरपंच-उपसरपंच (Sarpanch And Deputy Sarpanch) पदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये कोणी सरपंच, कोणी उपसरपंच झालंय. मात्र, कवठेपिरान ग्रामपंचायतीमध्ये चक्क पती-पत्नी सरपंच आणि उपसरपंच बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. अनिता माने यांची सरपंच तर त्यांचे पती भीमराव माने यांची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे.
कवठेपिरान हे गाव हिंदकेसरी पै. मारुती माने यांचे गाव म्हणून ओळखले जाते. माने कुटुंबाची गेल्या 50 वर्षांपासून कवठेपिरान गावात सत्ता आहे. त्यांचे पुतणे भीमराव माने हे गेल्या 25 वर्षांपासून गावाचे नेतृत्व करतात.
आदर्श सरपंच म्हणून भीमराव माने यांची ख्याती आहे. माने यांच्या नेतृत्वाखाली गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि तंटामुक्त अभियानात पहिला क्रमांकसुद्धा मिळवला आहे.तर भिमराव माने यांनी हे जिल्हापरिषद सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. त्यामुळे माने कुटुंबाच्या नेतृत्वाखाली गावाचा कारभार चालतो.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भीमराव माने यांच्या नेतृत्वाखालील गटाने 17 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला. इतकंच नव्हे तर यंदा भीमराव माने यांनी स्वतःबरोबर आपल्या पत्नीला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि दोघा पती-पत्नीचा विजयही झाला. तर यंदा ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण हे खुला महिला गट पडल्याने माने गटाने भिमराव माने यांच्या पत्नी अनिता माने यांना सरपंच आणि भीमराव माने यांची उमेदवारी निश्चित केली होती. पार पडलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत माने दाम्पत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गावाचा कारभार आजपर्यंत भीमराव माने, तर त्यांच्या पत्नी घरचा कारभार पाहत होत्या. मात्र, उच्चशिक्षित असलेल्या अनिता माने घरच्या बरोबर गावाचाही कारभार सरपंच म्हणून सांभाळणार असून त्यांच्या जोडीला घरा प्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे पती उपसरपंच म्हणून हातभार लावण्यासाठी असणार आहेत. त्यामुळे गावाचा विकास 100 टक्के होईल. असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत (Mane Husband And Wife).
महिला सरपंच जरी असली तरी सरपंच म्हणून गावचा अनधिकृत कारभार हा सरपंचाच्या पतीकडून केला जातो. मात्र, कवठेपिरान ग्रामपंचायतयामध्ये आता सरपंच उपसरपंच पती -पत्नी अधिकृतपणे करणारा आहेत आणि महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे, असा दावा ग्रामस्थ करत आहेत.
पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य, आता सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार!https://t.co/AgI64VZwtO#nagar #Politics #grampanchayatelection2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021
Mane Husband And Wife
संबंधित बातम्या :
आदर्श गाव हिवरे बाजारच्या उपसरपंचपदी पोपटराव पवार, सरपंच कोण?
पुण्यात ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर, सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जादूटोणा झाल्याचा दावा
व्हायरल फोटोने धमाल, सगळे म्हणतात ‘आमची कमाल’!, वाचा एका व्हायरल फोटोची कथा!