पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे (ST workers) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याबाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी (st) कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडेंनी सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. पुण्यातून एक लाख दहा हाजर रुपये जमा करण्यात आले, आम्ही अजय गुजर यांच्या सांगण्यावरून हे पैसे जमा केल्याचे संजय मुंडे यांनी म्हटले आहे. जे कर्मचारी निलंबित होते त्यांच्याकडून प्रत्येकी 540 रुपये तर ज्या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती त्यांच्याकडून प्रत्येकी तीनशे रुपये घेतल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. राज्यातील तब्बल 250 डेपोमधून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. पहल्या टप्प्यात आम्ही स्वारगेट डेपोमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले, ही रक्कम एक लाख दहा हजार इतकी होती. ती आम्ही गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याकडे दिल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील सर्व डेपोमधील कर्मचाऱ्यांची संख्या पकडली तर हा अकडा अडीच कोटींच्या आसपास जातो असे मुंडे यांनी सांगितले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी केला आहे. ज्या लोकांवर कारवाई करण्यात आली नव्हती त्यांच्याकडून प्रत्येकी तीनशे रुपये तर ज्यांच्यावर कारवाई झाली होती, त्यांच्याकडून प्रत्येकी 540 रुपये आंदोलन काळात गोळा करण्यात आल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. आम्ही स्वारगेट आगारामधून अजय कुमार गुजर यांच्या सागण्यावरून कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले, पहिल्या टप्प्यात आम्ही गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपये जमा केल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. मुंडे यांनी केलेल्या या आरोपांमुळे आता वादात आणखी भर पडली आहे.
दपम्यान आता या पैशांचे पुढे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याच्या स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर आता राजकीय वर्तृळातून देखील यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे, सजंय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरुवातीपासूनच एसटी आंदोलनाप्रकरणात सदावर्ते यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. मात्र आता संजय मुंडे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात…