सांगली: राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी आजचा दिवस हा अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याचं म्हटलं आहे. भारतात आज जगामधील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. देशासाठी आनंदाची बाब म्हणजे आपल्या देशात निर्माण केलेल्या दोन लसींच्या माध्यमातून ही सुरुवात झाली आहे.शासकीय स्तरावर लसीकरणाचे चांगले आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. संजय ओक यांनी दिली. (Dr. Sanjay Oak said corona vaccination day is glorious and joyful for us)
डॉ.संजय ओक यांनी ही लस तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याचं सांगितलं. आज पहिल्या स्तरात राज्यातील हेल्थ केअर वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. सर्वांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे. लस घेण्यासाठी आल्यानंतर गडबड करु नये, मतदान ज्याप्रमाण शांततेत रांगेत उभं राहून करतो. त्याप्रमाणे लस घ्यावी. कोरोना लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीनं अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबणं आवश्यक असल्याचं संजय ओक यांनी स्पष्ट केले. कोरोना लस घेण्यासाठी आल्यानंतर काही प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्या व्यक्तींना अॅलर्जी आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार नसल्याचेही ओक म्हणाले.
केंद्र सरकारनं कोरोना लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. लस घेतल्या नंतर 99% टक्क्या हून अधिक लोकांना काहीही होणार नाही. उलटी येणे, मळ मळ होतेय अस वाटू नये म्हणून लस दिल्यावर लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबवून घेतले जाणार आहे, असं संजय ओक यांनी सांगितले.
सोमवारी लस घेणार
कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचे काहीही साइड इफेक्ट समोर आलेले नाहीत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्हीच पहिल्यांदा ही लस घेण्याचा निर्णय टास्क फोर्समध्ये घेतला आहे. कोरोना ज्यांना झाला नाही किंवा ज्यांना होऊन गेला असेल त्यांनी लस घ्यायची आहे. कोरोना लस घेतल्याचा तुम्हाला फायदा होईल, मी सोमवारी सकाळी लस घेणार आहे, असं संजय ओक यांनी स्पष्ट केले.
डॉ.संजय ओक यांनी सोशल मीडियावरुन पॉझिटिव्ह आणि चांगले मेसेज पाठवावेत.समाजापर्यंत पोहोचण्याची ताकद सोशल मीडियात आहे.जगात पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला असताना भारतात कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये यशस्वी झालो. याच श्रेय जनतेचे आहे, असंही संजय ओक यांनी स्पष्ट केले. कोरोनावरील लस जरी आली असली तरी मास्क आणि सोशल डिस्टसिंग ठेवावे. लसीकरणाचा कार्यक्रम पुढे पुढे चालू राहील. आज दोन लसी आहेत. मे महिन्यापर्यंत भारतात 6 लसी उपलब्ध होतील.त्यावेळी जनतेला मोठ्या प्रमाणात लस देता येईल. 2021 मध्ये कोरोनावर निंयत्रण मिळवण्यात यश येईल, असं संजय ओक म्हणाले.
राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण#NarendraModi #CoronaVaccine #VaccineForIndia #vaccinationCovid #vaccination https://t.co/Vw6gM5j8LI
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
संबंधित बातम्या
राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण
(Dr. Sanjay Oak said corona vaccination day is glorius and joyful for us)