पुणे: मध्यंतरीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली होती. यावेळी राहुल यांनी शिवसेना वाढण्याचं, टिकण्याचं रहस्य राऊत यांना विचारलं होतं. या भेटीतील चर्चेवर राऊत यांनी आज प्रकाश टाकला. फटे लेकीन हटे नही त्यामुळेच शिवसेना वाढली, असं राहुल गांधींना सांगितल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (Sanjay Raut acquainted Rahul Gandhi with Shiv Sena structure)
संजय राऊत आज शिरुर-हवेली इथे आले होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी हा किस्सा सांगितला. मध्यंतरी राहुल गांधी आणि माझी भेट झाली. त्यांना शिवसेनेबाबतचं खूप कुतुहूल होतं. शिवसेना कशी वाढली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. राहुल गांधींनी विचारलं की तुमचा पक्ष कसा टिकवला. आजही लोक शिवसेनेला का घाबरतात? असं त्यांनी मला विचारलं. मी राहुल गांधींना म्हटलं बाळासाहेबांनी घडवलेल्या शिवसैनिकांच्या मनात स्वार्थ नाही. कशाचीही लालसा नाही. आमच काळीज वाघाचं आहे. फटे लेकीन हटे नही म्हणून शिवसेना वाढली असं मी त्यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले. आज एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे जेवढे खासदार नाहीत, तेवढे खासदार शिवसेनेचे आहेत. ही शिवसेनेची ताकद आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेना हा लाव्हा आहे. शिवसेना मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटात आहे. आज आमदार आहेत. उद्या असतील की नाही माहीत नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा. शिवसेनेला जेवढं जास्त रेटाल तेवढी ती पुढे येईल. शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली. त्यामुळे शिवसैनिकांसारखे वागा. लोकांना एकत्रित घेऊन काम करा. बाळासाहेबांचा जो मंत्र आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण ते करा, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केलं.
आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असं मी म्हटलं होतं. याचा त्यांना एवढा त्रास झाला की गुन्हा दाखल करा म्हणाले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार, असा टोला हाणतानाच चंद्रकांतदादांना महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलेलं सहन होत नाही. जेवढे तुम्ही तडफडत राहणार. तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. आघाडीच्या नेत्यांनाही सांगणं आहे की, तुम्ही विरोधकासारखे वागू नका. मी आज वरिष्ठांशी बोलेन. ऐकलं तर बघू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू, असं ते म्हणाले. कोण आला रे कोण आला, ही घोषणा भाजपात बघितली का? ती फक्त शिवसेनेतचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सरकार आलं तरी प्रश्न तेच आहेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा म्हणायचो आमचं सरकार आल्यावर बघू. मात्र आता बघयाची वेळ आलीये असं वाटतं, असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे दिला. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालंय. मात्र स्थानिक पातळीवरील जे वतनदार असतात त्यांनी संयम ठेवावं. काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबरच संसार करायचा आहे. भाजपासोबत सरकार होतं तेव्हा ही हेच होत होतं. त्यांनी आपलं ऐकलं नाही तर तुम्हीही मुख्यमंत्री आमचा आहे असं सांगा. सरकारमधली माणसं चांगली असतात. मात्र स्थानिक राजकारणाचा विषय येतो तेव्हा चढाया सुरू होता. आधीच्या सरकारमध्येही हाच त्रास होता. आपण एवढं ताकदवान व्हायला की पाहिजे पुढच्या वेळेला तो निवडून येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. (Sanjay Raut acquainted Rahul Gandhi with Shiv Sena structure)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 September 2021 https://t.co/K3p0CpSnuk #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021
संबंधित बातम्या:
दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, सरकारलाच आता निवडणुका नकोय; राज ठाकरेंचा हल्लाबोल
तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा; संजय राऊतांचं चंद्रकांतदादांना आव्हान
(Sanjay Raut acquainted Rahul Gandhi with Shiv Sena structure)