राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे जवळपास 150 कोटी थकवले!

| Updated on: Mar 17, 2021 | 10:59 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निधीला राज्य सरकारने कात्री लावली आहे. पुणे विद्यापीठाचे राज्य शासनाने 144 कोटी रुपये थकवले आहेत. | Savitribai Phule Pune university

राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे जवळपास 150 कोटी थकवले!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निधीला राज्य सरकारने कात्री लावली आहे. पुणे विद्यापीठाचे राज्य शासनाने 144 कोटी रुपये थकवले आहेत. अधिसभा सदस्य डॉ. कान्हू गिरमकर यांनी लेखी प्रश्न विचारला असता विद्यापीठाने ही माहिती दिली आहे. (Savitribai Phule Pune university arrears 150Crore State Government)

दीडशे कोटींच्या आसपास थकबाकी

राज्य शासनाकडून दरवर्षी प्राध्यापक शिक्षकांना वेतनासाठी निधी दिला जातो. मात्र हा निधी वेळेवर मिळाला नसल्याने जवळपास दीडशे कोटींच्या आसपास थकबाकी पोहोचली आहे. गेल्या वर्षात विद्यापीठाकडून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अवघा 16 कोटींचा निधी खर्च केला गेला असल्याचंही यानिमित्ताने समोर आलं आहे.

विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता

विद्यापीठाकडून विविध विभागात तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त केले -जातात. त्यांचे वेतन हे विद्यापीठ फंडातून दिले जाते. निधीच्या नावे असलेल्या मोठ्या ठेवी कमी झाल्याने विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जातीय.

राज्य सरकारकडून निधी वेळेवर मिळत नसल्याचा विद्यापीठाचा आरोप आहे. दुसरीकडे राज्य सरकारने विद्यापीठाचे पैसे का थकवले?, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

किती रक्कम खर्च केली गेली?

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विद्यापीठ फंडातून किती रक्कम खर्च केली जातीय?, आतापर्यंत किती रक्कम खर्च केली गेली? याची आकडेवारी डॉ. गिरीमकर यांनी विद्यापीठाकडे मागितली विद्यापीठाने माहिती दिली की,
2019-2020 : 17 कोटी 79 लाख 50 हजार आणि 20 कोटी 74 लाख 48 हजार
2020-2021 : 16 कोटी 78 लाख, 60 हजार आणि 23 कोटी 35 लाख 35 हजार

(Savitribai Phule Pune university arrears 150Crore State Government)

हे ही वाचा :

नाशिकमध्ये ‘नो शुभमंगल, ओन्ली सावधान’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

माजी केंद्रीय मंत्री, अहमदनगरचे भाजप नेते दिलीप गांधी यांचे दिल्लीत निधन