पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार असल्याचं सांगत तारखा जाहीर झाल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (Savitribai Phule Pune University Exam Will Online Date)
विद्यापाठीची परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात समजणार आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींशिवाय ही परीक्षा देता यावी, यासाठी उपापयोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं विदयापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होईल. गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.
कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह अंतिम वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली. ऑनलाईन परीक्षा घेतल्याने वेळेची बचत होणार आहे. तसंच निकालाला देखील वेळ लागणार नाही. अगदी महिन्याभरात मुलांच्या हाती निकालपत्र भेटू शकते.
मार्च महिन्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 ते 20 मार्च या कालावधीत तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 30 मार्चपासून घ्यावी, असं एकंदरित मत या बैठकीत मांडलं गेलं आहे, असं विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितलं.
(Savitribai Phule Pune University Exam Will Online Date)
हे ही वाचा :
ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळात घोळ; पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अभाविपचे जोरदार आंदोलन