पुणे – कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा (school ) आणि महाविद्यालये (collage ) बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या कोरोना (corona) आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy CM Ajit Pawar ) यांनी दिली आहे. कोरोना अजूनतरी आठ आठ दिवस तरी कोरोनाचा आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार
राज्य सरकारच्या निर्णयानंतर शहरातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार. तो पर्यंत कडे निर्णय घेणार नाही. कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून ही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. कोरोना बाबतच्या नियमावलीचा निर्णय घेत असताना आम्ही सर्वाना विचारात घेतो असा टोलाही त्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे, याबरोबरच जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 51 टक्केमुलांचे लसीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता
पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेत आहे हे सांगण्याबरोबरच शहरातील कोरोनाच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रकही लवाकरच जाहीर केलं जाणार आहे. शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
उद्याने सकाळच्या सत्रात सुरु राहणार !
पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
जलतरण तलाव सुरु !
पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
पर्यटनालाही परवानगी
जिल्ह्यातील सिंहगड, भीमा शंकरला येथे पर्यटकांना जाता येणार आहे. या पर्यटना स्थळाजवळील दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेण्याद्री आणि अष्ट विनायकाला भाविकांना परवानगी देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. मात्र गर्दी झालयास निर्बंध लावणार असल्याचेही सांगण्यात आल्या आहे.
Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर