1967 साली मला कठीण काळात विजयी केलं. सोमेश्वर कारखान्याचे बाबलाल काकडे यांच्या विरोधात मला निवडून दिलं. मी नुकताच कॉलेज जीवनातून बाहेर आलो होतो. बारामतीमधील तरुण पिढीने मला नेहमीच साथ दिली. आजची निवडणूक ही सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केलं. बारामती मधील जनतेला कोणतं बटन दाबायचं हे सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा ज्यास्त मतांनी निवडून आल्या. देशाच्या पंतप्रधान यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे ज्यास्त मतांनी निवडून आल्या, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये ठिकठिकामी जनसंवाद सभा आणि आयोजन करण्यात येत आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, उत्तम जानकरदेखील शरद पवारांसोबत आहे. या दौऱ्या दरम्यान शरद पवारांनी बारामती लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
शेतकरी अडचणीत कसा येईल, याचा विचार मोदी सरकार करतं. मोदी सरकारमधील लोक म्हणतात आम्ही खाणारे लोकांचा विचार करतो परंतु पिकविणाराने पिकवले नाही तर खाणारा काही खाईल. सत्ताधारी यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणालेत.
यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ‘मोदी की गॅरंटी’ नावाखाली प्रचार केला. पण ही नरेंद्र मोदींची गॅरंटी ही खरी नसून लोकांची गॅरंटी खरी आहे. मी कृषिमंत्री असताना यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. तेव्हा देशात आम्ही 75 हजार कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी बारामतीमधील लाटे, पणदरे या गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवणुकीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 1967 साली राजकारणाची स्थिती वेगळी होती. महाराष्ट्र आणि देशात यावेळेस निवडणूक वेगळी होती. यावर्षी बारामती निवडणूक संबंध देशात गाजली. या वर्षीच्या निवडणुकीत लोकांवर दमदाटी किंवा दबाव आला तरी लोक मतदानाला गेल्यावर योग्य बटन दाबतील ही मला खात्री होती, असं शरद पवार म्हणाले.