मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप करणारे ते आणि क्लीन चीट देणारे ते,मग आरोप केले की खरे याचा उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजेत, ते आरोप करत होते,त्यामुळे उत्तर द्यावं लागलं त्यांना,सगळ्यावर आरोप केले आमच्यावर,काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत आरोप केले असा टोला त्यांनी लगावला.
निरोपच मिळाला नाही
पवार गेले नाहीत, ते काहीही बोलत आहेत. ते आता आरक्षणावर बोलत आहेत. आरक्षणावर मी 10 वर्षांपासून बोलत आहे, आरक्षणावर कुठे बोलले पाहिजे, आधी मोदी सरकारने 10 वर्षात अनेक आरक्षण बिल आणले. त्यावर मी बोलले. प्रस्ताव नव्हता म्हणून बैठक गेलो नाही, आमंत्रण कुणाला दिलं माहिती नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या बैठकीचं आमंत्रण मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी एक फोन करावा, मला फोन केला तर मी जाईल, सर्व आरक्षणावर बैठकीत बोलले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विधानसभेपूर्वीचे हे तर गाजर
भाजप जुमला पार्टी आहे अजून दोन महिने आहेत काय काय करतील,सगळ्या महिलांनी लाडकी बहिण योजना फॉर्म भरला पाहिजे. एवढं वेळ देऊन अजित दादा योजना पोहचवत असतील तर चांगलं आहे. राज्यातील बेरोजगारी, भ्रष्टाचार महागाई एवढी झाली की मला दुसरं कळत नाही, असा टोला त्यांनी या योजनेवर सरकारला लगावला.
सर्वसामान्य भूलथापांना बळी पडणार नाही
भाषण असच करायचं असतात, मुंबई बद्दल चांगले बोलले हे चागलं झालं. मुंबईला दूर करू नका. महारष्ट्रपासून तोडू नका. ,मेरिट मुलाची हक्कच्या जागा घालवू नका, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर केला. खोके वाले मतदान करायला लागेल आहेत. पण सर्वसामान्य माणूस भुलथापांना बळी पडत नाही.काहीही झालं तरी केंद्र बिंदू पवार 60 वर्ष सत्तेत राहिले आहेत काही तरी क्रेडिट द्या, असा टोला त्यांनी लगावला.
पुणे क्राइम कॅपिटल
सर्वाधिक क्राईम पुण्यात होत आहेत, पुणे क्राईम कॅपिटल होत आहे. सगळं पुण्यात होत आहे. कोयता गँग, ड्रग्ज, कार अपघात हे सर्व पुण्यात घडत आहे, यावरुन त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. पूजा खेडकर प्रकरणात त्यांनी संपूर्ण चौकशीची मागणी केली. त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. त्याचे पुरावे सादर करावे आणि पारदर्शक चौकशी करावी असे मत त्यांनी मांडले.