Sharad Pawar : पुरंदरेंइतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही; शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रंथप्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले पवार?

| Updated on: Jul 23, 2022 | 4:36 PM

महाराष्ट्रात काही पुस्तके ही खूप लोकप्रिय ठरली, लोकांनी घराघरात ठेवली ती पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके... बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही, असे शदर पवार म्हणाले.

Sharad Pawar : पुरंदरेंइतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही; शिवचरित्र आणि विचारप्रवाह ग्रंथप्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले पवार?
शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शरद पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : गेल्या काही काळात अनेकांनी शिवचरित्र (Shiv charitra) लिहिली, त्यात काहींनी वस्तुस्थिती मांडली, काहींनी धादांत खोटी माहिती लिहिली, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते तर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांवर आसूड ओढला. काहींनी चुकीचा इतिहास लिहिला, असे म्हणत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर टीकाच केली. हा ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांचा असा समज होईल हे शिवचरित्र आहे. मात्र हे शिवचरित्र नाही, असे शरद पवार म्हणाले.

‘शिवाजी महाराजांचे राज्य रयतेचे’

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य कधी भोसल्यांचे राज्य झाले नाही, ते रयतेचे राज्य राहिले आहे. शिवछत्रपती यांची समाधी महात्मा फुले शोधून काढली. हे महत्त्वाचे काम महात्मा फुले यांनी केले. हे करत असताना शिवछत्रपतींचा उल्लेख फारसा कधी छत्रपती म्हणून केला नाही, तर कुळवाडी, कुलभूषण असा केला. काही घटकांनी शिवछत्रपती यांचे चरित्र लिहिताना धर्मांधता कशी वाढेल, अशा पद्धतीने लिहिला, असा आरोप शरद पवारांनी केला.

‘खोलात जायचे नाही’

महाराष्ट्रात काही पुस्तके ही खूप लोकप्रिय ठरली, लोकांनी घराघरात ठेवली ती पुस्तक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके… बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसरा कोणी केला नाही. दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांचे योगदान काय, याच्या खोलात जायचे नाही. पण राजमाता जिजाऊ याच शिवाजी महाराज यांच्या गुरू, मार्गदर्शक होत्या, हे स्पष्ट झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले शरद पवार?

‘खरा इतिहास नव्या पिढीला द्यायचा आहे’

काहींनी शिवचरित्रात मांडलेल्या गोष्टी अनेकांना न पचणाऱ्या डायजेस्ट न होणाऱ्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांनीही खरा शिवाजी मांडला. सत्यावर आधारलेल्या खरा इतिहास नव्या पिढीला द्यायचा आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.