लोकसभा निवडणुकीत धामधूम संपली आहे. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. यानंतर शरद पवार आज बारामतीत आहेत. युगेंद्र पवार यांनी घेतलेल्या जनता दरबारला पवारांनी हजेरी लावली. तेव्हा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. इथे मागच्या वेळी काय झालं? त्याचा खुलासा केला त्याची गरज नाही. निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी कानावर येत होत्या. पण मी शांत होतो. मला मला माहिती होत बारामतीकर सुज्ञ आहेत. त्याचा अनुभव मला आला… मतदारांनी शहापणा दाखवला. हे मी फक्त मी आज बघतो असं नाही. तर 1967 पासून हे मी पाहात आलो आहे. यंदा बारामतीची चर्चा न्यूयॉर्कमध्ये झाली. तुम्ही काय साधी लोकं आहात एका कुठपर्यंत जाऊन पोहोचलात ते…, असं शरद पवार म्हणाले.
आता महाराष्ट्रमध्ये सुरुवात करायची आहे. लोकसभेला 48 पैकी आमच्या 30 जागा निवडून आल्या. आता विधानसभेवर लक्ष ठेवलं पाहिजे. माझ्याकडे राज्याची सत्ता दिली. त्यावेळी अनेक बदल केले. पुण्यात, बारामती, पुरंदर, इंदापूर, चाकण, शिरवळ या ठिकाणी व्यापाराची आणि उद्योगाची केंद्र बनली आहेत. आज हिंजवडीमध्ये 3 लाख लोकांना काम मिळलं आहे. जेवढा काळ आमच्या हातात असेल तेवढा वेळ इथं मोठं उद्योग आणि व्यापार आणणार आहे. त्यासाठी तुमची साथ आवश्यकता आहे. इथं राजकरण आणायचं नाही फक्त अर्थकारण कसं वाढवायचं हे पाहायचं आहे, असं शरद पवार म्हणाले.
बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत वकिलांचा मेळावा होत आहे. बारामती, इंदापूर आणि दौंड येथील वकीलांशी शरद पवार संवाद साधत आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमध्ये वकिलांसाठी आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील करणार बारामती तालुक्याचा दुष्काळी दौरा करणार आहेत. उद्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा दुष्काळी दौरा करणार आहेत. तर परवा शरद पवार बारामती तालुक्यातील अनेक दुष्काळग्रस्त गावांना भेटी देणार आहेत. या भेटीत युगेंद्र पवार स्वतः शरद पवारांसोबत असणार आहेत. आज सकाळीच कार्यकर्त्यांनी भेटून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी शरद पवारांकडे केली होती. परवा होत असलेल्या बारामती तालुक्याच्या शरद पवारांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार स्वतः शरद पवारांसोबत दौरा करणार आहेत.