साताऱ्यातील पोटनिवडणुकीत शरद पवारांची जाहीर सभा सुरु होती. यावेळी अचानकपणे पाऊस आला. त्या भरपावसात शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं. त्यांच्या या सभेची सर्वत्र चर्चा झाली. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा या गावाला त्यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी साताऱ्यातील सभेची आठवण करून दिली. दुष्काळ पाहायला आलो अन् पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा अन् माझ नातं काय आहे, माहिती नाही. पाच वर्षापूर्वी सातारा मध्ये सभेत पाऊस पडला, असं शरद पवार म्हणाले.
निवडणुका झाल्या माझ्या लक्षात आल राज्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे. तेव्हा ठरवलं काही भागात जाऊन लोकांशी बोलावं,अडचणी जाणून घ्याव्या. एवढा पाऊस पुरेसा नाही. काही ठिकाणी गाळ आहे. साठवण क्षमता कमी आहे. राज्य सरकारचं पाटबंधारे खात याची बैठक घेऊन सोडविणार आहे. जर यांनी नाही केलं तर चार महिन्यांनी सरकार बदलायचं आहे. मग काम कशी होत नाहीत मग बघतो, असं शरद पवार म्हणाले.
राज्यकर्ते योग्य रितीने बघत नाहीत. चार महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत आपलं काम चोख करा. तुम्ही सगळे करून दाखवा. तिथं ही तुतारी वाजवा. तुम्ही सगळे साथ द्यायला खात्री आहे. राज्यात बदल होत आहे. त्यात महिलांचा वाटा जास्त आहे. आता ही महिलांची उपस्थिती अधिक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंना तुम्ही लीड दिलं. त्यांना इकडे यायची ईच्छा होती. पण त्यांना मुलाच्या पदवीदान समारंभला उपस्थितीत राहिल्या आहेत. 14 निवडणुका लढलो. एक निवडणूक वगळता सगळ्या इथं लढलो. पण तुम्ही कधी मला घरी पाठवलं नाही. यावेळी देशात नाही जगात बारामती लोकसभा निवडणूक चर्चिली गेली. बारामती लोकसभा मतदासंघांत विक्रम तुम्ही केला. लोकशाही सामान्य लोकांमुळे टिकली आहे, असं शरद पवार यांनी दौंडमध्ये बोलताना म्हटलं आहे.
मला म्हटले की, भटकती आत्मा.. तर मी म्हटलं आता मी तुम्हाला सोडणार नाही. मी अशा वेळी बाहेर पडलो की पाऊस पडतो, पाऊस सुरू आहे. पाणी प्रश्न साठी मी राज्य सरकारशी वेळ घेऊन या कामाबद्दल निघतोय का बघणार आहे. मी ठरवले आहे चार महिन्याने राज्य हातात घ्यायचं. तुम्ही साथ द्या. आपण एकत्रित राहू या सगळ्या दुष्काळी भागाच दुखणं कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असं पवारांनी म्हटलंय.