पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे (Pune) या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांचा भव्य सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) करण्यात आला. यावेळी शरद पवार, श्रीनिवास पाटील, सुशीलकुमार शिंदे यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दलचे किस्से सांगितले. शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांची भेट कशी झाली ते सांगितलं. श्रीनिवास पाटील यांनी डान्समध्ये विद्यापीठात सुवर्णपदक मिळवलं यासंदर्भातील किस्सा सांगितला आणि सभागृहात हशा पिकला.
शरद पवार यांनी पवारांनी कॉलेज जीवनातला किस्से सांगितले. आम्ही कॉमर्स कॉलेजेला शिकायला होतो, देशातल मोठं कॉलेज होतं. तिथं मुली कमी होत्या. काही असल्यातरी त्या कॅम्पातल्या पारशी होत्या त्या इंग्लिश बोलायच्या मग आम्ही ग्रामीण भागातून आलेलो होतो काय बोलणार त्यांच्याशी….? असं शरद पवार म्हणाले म्हणून मग एसपी कॉलेज जवळ होत, अशा कामांना एसपी कॉलेज प्रसिध्द होत, तिथंच माझी आणि श्रीनिवास पाटीलची गाठ पडली ती कायमची, असं शरद पवार म्हणाले.
श्रीनिवास पाटील यांच्या मनात दुसऱ्या क्षेत्रात जाण्याबद्दल विचार सुरु होता. कॉलेजमध्ये कोणी तरी अतिशय उत्तम कथककल्ली डान्स केला होता. आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी आणि श्रीनिवास पाटील चाललो होतो त्यावेळी ते मला म्हणाले काल ज्यांनी डान्स केला त्या होत्या, तेव्हा पाटील म्हणाले ते बघा काल ज्यांनी नाच केल्या त्या आहेत. त्यांनी ऐकलं, त्या चिडल्या….मागे वळाल्या…मी म्हटलो मी नाही हा…. त्यांनी आम्हाला सुनावल, नाचायला ही अक्कल लागते….हे ऐकल्यावर आमच्यातला पाटील जागा झाला. दुसऱ्या दिसशी श्रीनिवास पाटील यांनी रोहिणी भाटे यांच्याकडे डान्स क्लास लावला. डान्सचा प्रॅक्टिस केल्यावर ते हॉस्टेलला आले की सांगायचे अंग भयंकर दुखतंय ते झोपायचे आणि आम्ही अंग तुडवायचे आणि असं करुन त्या नृत्यामध्ये नाव कमावलं. ज्यांनी आम्हाला टोमणा मारला होता. त्यांच्या बरोबर कथकल्ली नृत्य करायचा कार्यक्रम केला. पुणे विद्यापीठात पहिले आले. पुढं देशाच्या सर्व विद्यापीठांच्या कार्यक्रमात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. पुढे डान्स मध्येही विद्यापीठ पातळीवर सुवर्णपदक मिळवलं, हे फार जणांना माहिती नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.
IND vs PAK, WWC 2022 LIVE Streaming: भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कधी आणि कुठे पाहता येईल?