शिरूर/पुणे : पैशाची रक्कम पळवणाऱ्या चोरट्यांच्या (Thieves) मुसक्या शिरूर पोलिसांनी (Shirur police) आवळल्या आहेत. दोन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक (Arrest) केली आहे. कर्जाची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीच्या हातातली बॅग हिसकावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आता अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील बाळासाहेब खेडकर यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे. न्हावरे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ते आपल्या नातेवाईकांसह 7,13,000/- रू कर्जाची रक्कम भरण्यासाठी बँकेत जात होते. न्हावरे ते चौफुला डांबरी रोडने ते जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ती पिशवी जबरदस्तीने ओढली असता फाटली. त्यामुळे काही रक्कम रस्त्यावर पडली. तर आरोपींच्या हाती जवळपास 70,000 रुपये लागले. मिळालेली रक्कम घेऊन त्यांनी पोबारा केला.
याप्रकरणी बाळासाहेब खेडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासाची चक्रे फिरवत शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
#Pune : पैशाची बॅग हिसकावण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शिरूर पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.#crime #Thief #Video
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/rY5DhzzHgP— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2022