पुणे – शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक(Shivsena Raghunath kuchik) याची लैंगिक अत्याचारातील पीडित तरुणीने डीएनए टेस्ट करण्याचे मागणी केली आहे. पीडित तरुणीने आज पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांची डीएनए टेस्ट (DNA Test )करण्यात यावी आणि त्यानंतर त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. डीएनए टेस्टमधून सत्य समोर येईल असंही या तरुणीचे म्हणणं आहे. मी माझी डीएनए टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचे यावेळी तरुणीने सांगितले आहे .मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांना मेल करून माझी तक्रार दिली, असून त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचं या पीडित तरुणीचे म्हणणे आहे. राज्य महिला आयोगाकडे(State Women’s Commission) दिलेल्या तक्रारीवर आयोगाने तपास करावा अशीही मागणी तरुणीने यावेळी केली आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे.
पीडित 24 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडले असल्याचे सांगितले आहे.
Nagpur Crime | 60 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार; दुसरीकडं शिक्षिकेची विद्यार्थिनीला मारहाण