सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हटलं की सर्वांसाठी आनंदाचा दिवस असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी युवकांकडून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. तरुणाई महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करते. सोलापुरातील लोकआस्था संस्थेने ज्वारीच्या कडब्यापासून 150 बाय 75 फूट शिवरायांची प्रतिमा साकारलीय तर मुस्लीम युवकांनी 40 बाय 25 फुटांची रांगोळी साकारली आहे. ( Shivjjayanti 2021 ecofriendly celebration by youth of Solapur)
सोलापुरातील लोक आस्था फाऊंडेशनच्यावतीने बाळे येथील एक एकर शेतामध्ये ज्वारीच्या कडब्यापासून शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी शिव प्रेमी गर्दी करताना दिसत आहेत. पर्यावरण पूरक अशी शिवजयंती साजरी करत एक वेगळा संदेश लोकास्था संस्थेने देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी प्रतीक तांदळे आणि त्यांची टीम वेगवेगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी करत असते.एक एकर शेतामध्ये ज्वारीच्या कडब्यापासून शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी प्रतिमा साकारली आहे.यंदा त्यांनी अशा प्रकारे शिवजयंती साजरी केली आहे.ड्रोनद्वारे पाहिल्यास या प्रतिमेचे रूप अधिकच मोहक दिसून येतंय, अशी माहिती प्रतीक तांदळे यांनी दिली. आत्तापर्यंत प्रदीप तांदळे यांनी शहीद जवान अभिवादन,गणेश जयंती, महात्मा गांधी जयंती निमित्त अभिवादन विविध आकाराच्या आणि वेगवेगळ्या पेंटिंग बनवले आहेत.
चिराग अली या फाऊंडेशनमधील मुस्लीम युवकांनी शिवजयंती निमित्त शिवरायांची 40×25 फुटांची तसेच 150 किलो रांगोळी वापरून या तरुणांनी ही भव्य अशी प्रतिमा साकारलीय. सोलापुरातील चिराग अली या फाऊंडेशनमधील मुस्लिम युवकांनी शिवजयंती निमित्त शिवरायांची 40×25 फुटांची तसेच 150 किलो रांगोळी वापरून या तरुणांनी ही भव्य अशी प्रतिमा साकारलीय. ही प्रतिमा दयानंद महाविद्यालयातील वेलणकर हॉलमध्ये प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली आहे, अशी माहिती आयुब पठाण युवकानं दिली आहे. मुस्लीम युवकांनी रांगोळीद्वारे प्रतिमा साकारल्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण सोलापुरातील जनतेला पाहायला मिळत आहे.
शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश https://t.co/kWVlFXgdFp @CMOMaharashtra @mieknathshinde @AUThackeray #Shivjayanti #RaigadFort #FreeEntry
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
संबंधित बातम्या:
शिवजयंती होणारच,मराठा क्रांती मोर्चाचे शिवसेना भवनासमोर बॅनर
शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश