कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे महाविकास आघाडी सरकार यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी ते धडपडत आहेत. सध्या मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. इतर राज्यांमधील अशा प्रकारच्या आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही, यावर विचार करण्यात येत आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. ( Shivsena MP Dhairyasheel Mane Mane appeal to all leaders came together for Maratha Reservation)
राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. न्यायालयीन लढाई एका बाजूला सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. जबाबदार लोक प्रतिनिधी म्हणून कोणत्या समाजाच्या भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. कोणत्याही समाजाचं काढून घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षानं यामध्ये राजकारण करु नये. मराठा समाज हा अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारा समाज आहे. उपेक्षित असणाऱ्या लोकांना न्याय मिळण्यासाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.महाराष्ट्रातील बंधुभाव आणि एकात्मता कायम राहावी. त्यामध्ये कटुता येऊ नये, असं धैर्यशील माने म्हणाले.
शेतकरी आंदोलन करत होते तोपर्यंत देश त्यांच्यासोबत होता. लाल किल्ला 26 जानेवारीचा क्षण संपूर्ण जग पाहत असताना अशी घटना घडणं दुर्दैवी आहे. दिल्ली येथे चालू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलेले आहे ते चुकीचे आहे. भारत देश आपला लोकशाही देश आहे कालची घटना घडली आहे ती अतिशय चुकीची आहे. त्यामुळे कोणतेही आंदोलन करताना संयम ठेवून आंदोलन करावे. दिल्ली येथे झालेल्या पोलिसांवर हल्ल्याचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही. देश हा सर्वप्रथम आहे. कोणत्याही घटनांमुळे आपली प्रतिमा मलीन होते का? याचाही विचार करण्याची गरज असल्याचं, धैर्यशील माने म्हणाले.
शेतकऱ्यांचं आंदोलन आणि कायदा यामध्ये शिवसेना म्हणून काय भूमिका ठरेल ती आम्ही मांडू , असं खासदार धैर्यशील माने म्हणाले. बजेट अधिवेशन 29 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरु होईल,त्यामध्ये शिवसेनेच्या पार्लमेंटरी बोर्डाची जी भूमिका असेल ती मांडली जाईल, असं धैर्यशील मानेंनी सांगितले.
ऐकावं ते नवलचं! भाजप आमदार स्वपक्षाच्या खासदाराविरोधात 101 तासांचा उपवास धरणारhttps://t.co/FAAAJMrcl8#BJP | #UttarPradesh | #BJPUP | #protest
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021
संबंधित बातम्या:
गिरीश बापट हे भाजपचे खासदार नाहीत तर…. : अजित पवार
धैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक?
( Shivsena MP Dhairyasheel Mane appeal to all leaders came together for Maratha Reservation)