पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या वाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार आता पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Shocking revelation in Pooja Chavan suicide case)
दरम्यान पूजा चव्हाण प्रकरणावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. या प्रकरणात शिवसेनेच मंत्री संजय राठोड यांचंही नाव घेतलं जात आहे. त्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर शिवसेनेचे नेते मात्र याबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता पूजा चव्हाण प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय. पूजा चव्हाणने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडल्याचा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरु राहणार आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. पण पोलीस मात्र याबाबत अधिकृतपणे बोलत नाहीत. दरम्यान आज उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
पूजाच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या आजोबांनी केली आहे. सरकारनं CID सारख्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पूजाच्या वसंतनगरमध्ये राहणाऱ्या आजोबांनी केली आहे. पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे कुटुंब मानसिक धक्क्यात असून कुटुंब काही बोलायला तयार नाही. परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.
पूजा चव्हाण प्रकरणाला आज आठवडा होत आहे. या प्रकरणावर पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काही कायदेशीर अडचणी असल्याने गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच या प्रकरणातील दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
VIDEO : पूजा चव्हाण आतम्हत्या प्रकरणाची CBI चौकशी करा, पूजाच्या आजोबांची सरकारकडे मागणी#poojachavan #PoojaChavanSuicide @CMOMaharashtra pic.twitter.com/f5yeqL6Dhk
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या :
संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक
कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?
Shocking revelation in Pooja Chavan suicide case