दौंड (पुणे) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली पुणे -दौंड पॅसेंजर सेवा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकरीता सुरु करण्यात आली आहे. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पॅसेंजरला हिरवा झेंडा दाखवत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दौंडकरांना गोड बातमी दिली. (Shuttle Service Starts For Essential Service in Between Daund to Pune)
नोकरीच्या निमित्ताने दौंडमधून दररोज हजारोजण पुण्याला जात-येत असतात. कोरोना काळात शटल बंद असल्याने त्यांना प्रवास करता आला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही शटल सुरु व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांकरीता ही शटल सुरु करण्यात आली आहे.
पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकानंतर डेमू सुरु करण्याचा निर्णय झाला. मात्र, सेवा सुरु होण्यापूर्वीच पुन्हा तो निर्णय रद्द केला गेला. ही सेवा सुरू व्हावी यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी जोर लावला होता.
दौंडकरांनी दौंड-पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी या आधी रेल रोकोचा इशाराही देण्यात आला होता, त्यानंतर रेल्वे प्रशासन नरमले आणि आज दौंड पुणे शटल सेवा सुरू करण्यात आलीय. दौंड पुणे डेली पॅसेंजर रोज सकाळी 7.05 मिनीटांनी दौंड रेल्वे स्थानकावरून असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पुणे -दौंड पॅसेंजर सेवा सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना पुणे पोलिसांकडून ‘क्युआर कोड’वर आधारित पास घ्यावा लागणार आहे. पुणे पोलिसांच्या वेबसाइटवरुन त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येईल. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना रेल्वे स्थानकावरओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाने दिली आहे.
पुणे दौंड शटल सेवा
शटल क्रमांक पुण्यावरुन सुटण्याची वेळ दौंडला पोहोचण्याची वेळ
01489 सकाळी 7 वाजून 05 मिनिटे सकाळी 08 वाजून 50 मिनिटे
01491 सायं. 6 वाजून 45 मिनिटे सायं. 8 वाजून 30 मिनिटे
दौंड पुणे शटल सेवा
शटल क्रमांक दौंडवरुन सुटण्याची वेळ पुण्याला पोहोचण्याची वेळ
01490 सकाळी 07 वाजून 05 मिनिटे सकाळी 8 वाजून 50 मिनिटे
01492 सायं. 6 वाजून 15 मिनिटे सायं. 7 वाजून 55 मिनिटे
(Shuttle Service Starts For Essential Service in Between Daund to Pune)
हे ही वाचा :
मोठी बातमी: रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती
10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
नोकरी गेलेल्यांसाठी सरकारकडून Good News, मिळणार 50 टक्के पगार