सुनील थिगळे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : पुणे येथे एनसीपीचे नेते छगन भुजबळ आदिवासी मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, काही आदिवासी मंत्र्यांनी चांगलं काम केलं.पण, काही आदिवासी मंत्र्यांनी नको ते काम केलं. त्यामुळं याचा फायदा सर्वसामान्य आदिवासींना मिळाला नाही. आपल्याला रडून काहीच मिळणार नाही. मागे कोणी वनवासी परिषद भरविली. आम्ही आदिवासी आहोत वनवासी तुम्ही आहात. आदिवासी म्हणून आम्हाला आमचे अधिकार मिळाले पाहिजे. बिरसा मुंडा यांचं काम मोठं आहे. शत्रुवर चाल करायची धमक त्यांच्यात होती. फक्त धनुष्य बाणाने त्यांनी चाल केली. धनुष्य बाणाचा त्यांनी तीर मारला. आदिवासींच्या अडविलेल्या जागा मोकळ्या करा, अशी बिरसा मुंडा यांनी मागणी होती.
छगन भुजबळ म्हणाले, तुमचे अधिकार मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येवून मंत्रायलावर धडक मोर्चा केला पाहिजे. चमत्कार केल्याशिवाय नमस्कार मिळत नाही. इथं फक्त भुलभुलया केला जातोय. देशात मोठी धरण झाली. यात आदिवासींच्या जागा गेल्या. देशात 5g आला मात्र आमची मुलं हजार दोन हजारांत विकली जातात. इतकी गरिबी असेल तर हा देश कुठंय. इथं कोळशाच्या खाणी या आदिवासींच्या जागेवर आहेत.
थोडं काही बोललो की, विरोधक अंगावर येतात. माझीही परिस्थिती तीच झाली. मी फक्त बोललो सगळ्या फोटोंची पूजा शाळेमध्ये करा. सरस्वतीचा फोटो काढा, असं मी बोललो नव्हतो. शाळेत गेलं की फक्त सरस्वतीचा फोटो दिसतो. पोरांना वाटत की यांनीच हे केलं.
हंटर कमिशन आला तेव्हा ज्योतिराव फुले उभे राहिले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे सुद्धा बोलायचे नाही. मग खोट्या केसेस टाकायच्या. सगळ्या आदिवासी संस्कृतीचे जतन करायला पाहिजे. काही मंत्र्यांनी चुकीचं काम केली म्हणून आदिवासी समाजाला याचा फायदा झाला नाही, अशी टीका त्यांनी केली.
आपल्या जमिनी हडप केल्या. त्यासाठी आपल्याला पुन्हा लढावं लागेल. जुन्नरच्या लेण्याद्रीमध्ये वीर आदिवासी मावळ्यांच्या बलीदानाचं स्मरण करण्यासाठी आदिवासी समाज प्रबोधन मेळावा घेण्यात आला. यावेळी छगन भुजबळ यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केलं.