बिहारमधून गाठा पुणे, पुण्यातून गाठा बिहार
भारतीय रेल्वे, प्रवाशांच्या सुविधांसाठी वेळोवेळी काही जोरदार निर्णय घेते. अनेक प्रवाशांच्या मागणीनंतर रेल्वेने काही महत्वपूर्ण रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बिहारमधील जयनगर येथून ते पुण्यापर्यंत, दानापूर येथून ते पुण्यापर्यंत आणि मुझफ्फरपूर ते यशवंतपूरपर्यंत विशेष रेल्वे धावणार आहेत. पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. एमआयडीसी, आयटी हब, रिअल इस्टेटमधील मोठी उलाढाल यामुळे पुण्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यात बाहेरील राज्यातील मोठा वर्ग काम करतो. त्यांना या रेल्वेने मोठी सुविधा मिळणार आहे.
या नवीन रेल्वे धावणार
- जयनगर-पुणे – रेल्वे क्रमांक 055529 जयनगर ते पुणे वन वे स्पेशल ही 5 एप्रिल 2024 रोजी जयगनर येथून संध्याकाळी 5 वाजता सुटेल. ही रेल्वे दरभंगा, मुझफ्फरपूर, हाजीपूर, पाटीलपूत्र, आरा, बक्सर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शनसह विविध स्टेशनवर ती विसावा घेईल. 7 एप्रिल 2024 रोजी 5:35 वाजता ही रेल्वे पुणे स्टेशनवर येईल. या विशेष ट्रेनमध्ये स्लीपर क्लासचे 20 कोच असतील.
- दानापूर-पुणे वन वे स्पेशल ट्रेन – रेल्वे क्रमांक -03265 दानापूर-पुणे वन वे स्पेशल ट्रेन दानापूर येथून 4 एप्रिल रोजी रात्री 21.40 वाजता निघेल. आरा, बक्सर, पंडीत दीन दयाल उपाध्याय जंक्शनसह ती विविध स्टेशनवर थांबेल. 6 एप्रिल रोजी सकाळी 04.30 वाजता ही रेल्वे पुण्यात पोहचेल. या खास ट्रेनमध्ये स्लीपर क्लासचे 20 कोच असतील.
- बरौनी-कोइम्बतूर वनवे स्पेशल ट्रेन – रेल्वे क्रमांक -05279 बरौनी-कोइम्बतूर वन वे स्पेशल ट्रेन ही बरौनी रेल्वे स्टेशनवरुन 4 एप्रिल रोजी रात्री 23.45 वाजता निघेल. ही ट्रेन किऊल, झाझा, जसीडीह, चित्तरंजन, धनबाद, रांची येथून धावेल. 7 एप्रिल रोजी 4.00 वाजता ही रेल्वे कोइम्बतूर येथे पोहचेल. या स्वतंत्र ट्रेनमध्ये तृतीय वातानुकूलित श्रेणीचे 2, स्लीपर क्लासचे 13 आणि साधारण श्रेणीचे 3 कोच आहेत.
- मुझफ्फरपूर-यशवंतपूर – रेल्वे क्रमांक -05269 मुझफ्फरपूर-यशवंतपूर वन वे स्पेशल ट्रेन 4 एप्रिल रोजी मुझफ्फरपूर येथील रेल्वे स्टेशनवरुन दुपारी 15.30 रवाना होईल. ही रेल्वे हाजीपूर, पाटलीपूत्र, आरा, बक्सर, पंडीत दीन दयाल उपाध्याय जंक्शनसह इतर अनेक स्टेशनवर थांबेल. 6 एप्रिल रोजी ही रेल्वे रात्री 19.00 वाजात यशवंतपूर येथे पोहचेल. या विशेष रेल्वेत द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे 1, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे 3, स्लीपर क्लासचे 9 आणि साधारण श्रेणीचे 3 कोच आहेत.