“सावरकरांच्या जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवणे हे शोभणारं नाही”; राष्ट्रवादीच्या नेत्याने सरकारवर साधला निशाणा

| Updated on: May 28, 2023 | 8:27 PM

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा महाराष्ट्र सदनातील हटवल्यामुळे त्यांनी राज्य सरकारला म्हटले आहे की, या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत तरी हे सरकार दाखवणार का ? असा सवाल त्यांनी सरकारल विचारला आहे.

सावरकरांच्या जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवणे हे शोभणारं नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने सरकारवर साधला निशाणा
Follow us on

पुणे : देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन होत असतानाच भारतातील 19 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने राज्यातील काँग्रेससह राष्ट्र्वादी काँग्रेसने केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्यानंतरही राज्यात गोंधळ घालणारे आमदार गोपीचंद पडळकर हे शांत का आहेत असा सवाल आता आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि राज्य सरकारवर त्यांनी प्रचंड टीका केली आहे. महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

केंद्र सरकारकडून हे केले जात असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी तसेच महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचाच नाही तर देशाच्या अस्मितेचा अपमान केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी ज्या प्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

 

गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता पडळकर आणि पवार हा वाद टोकाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा महाराष्ट्र सदनातील हटवल्यामुळे त्यांनी राज्य सरकारला म्हटले आहे की, या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत तरी हे सरकार दाखवणार का ? असा सवाल त्यांनी सरकारल विचारला आहे.