पुणे – शहरातील नवले पुलावर सातत्याने अपघात होत असतात. आजही नवले पुलावर(Nawale bridge) झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दोन जण जखमी झाले आहेत तर सात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने (Truck ) समोरच्या वाहनाला जोराची धडक दिली. यामुळे त्याच्या पुढं असलेल्या इतर वाहनांना त्याचा धडक इतर वाहनांना बसली. अपघातात दोन जन जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघतात यापूर्वीही याठिकाणी अपघात झाल्याने अनेकाना आपला जीव गमवले आहेत.या घटनेमुळे पुलावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी तातडीने अपघात ग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक कोंडी सुरळीत करून दिली.
अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रजकडून नवले पुलाकडे निघालेल्यासिमेंटच्या ट्रकचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाचे वाहनावरीला चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक समोरील वाहनांवर जाऊन आदळले. कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला ट्रक यावरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर सिग्नलला उभ्या असणाऱ्या चार चाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पाच चारचाकी वाहने व दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका चार चाकी वाहनाचे व रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी चालक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.या घटनेमुळे पुलावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी तातडीने अपघात ग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक कोंडी सुरळीत करून दिली.
Akola | ‘मरनेवाले को हम जिंदा कर सकते है’ Bacchu Kadu यांचा मोदींना टोला
Shane Warne Death: शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, मृतदेहाजवळ ती महिला कोण होती?
Russia Ukraine War : मोदी आणि पुतीन यांच्यात तासभर चर्चा, रशियाचा युक्रेनबाबत पवित्रा काय?