राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप शरद पवारांचा पाठिंबा घेत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. तालुका आणि प्रदेशकार्यकारणी यांच्यात समन्वयक होत नाही. तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका असं म्हटलं आहे, असं सुनील शेळके म्हणालेत.
मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेते किंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत. वेगळी स्टेटर्जी करत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत, असा गंभीर आरोप सुनील शेळके यांनी केलाय.
अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. पक्ष एकसंघ कसा राहील हे भाजपच्या नेत्यांनी पाहावं आमच्यात लुडबुड करून भांडण लावू नये. महायुतीत तेढ निर्माण करण्याच काम भाजपममधील काही पदाधिकारी करत आहेत. मला आनंद आहे की राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि प्रांतिक पक्ष ठाकरेंची शिवसेना, शरद पवार गट स्वतः च चिन्ह घेऊन मावळ विधानसभेत उतरू शकत नाही. याचा अर्थ महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे, असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यानंतर फोनद्वारे त्यांच्याशी संवाद झाला. अजित पवारांना समक्ष भेटलो आहे. भाजपमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे पाहावं. आमच्याकडे येऊन लुडबुड करायची आणि भांडण लावायचे हे उपद्व्याप करू नयेत, असं शेळके म्हणालेत.