आम्ही जो निधी मागतो त्यावर…; सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप

| Updated on: Sep 25, 2024 | 2:58 PM

Supriya Sule Accusation : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले. सुळे काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

आम्ही जो निधी मागतो त्यावर...; सुप्रिया सुळेंचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळे
Follow us on

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केलं आहे. आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यांना निधीतून वगळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी काय आरोप केले?

आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते. आम्हाला निधी दिला जात नाही. आम्ही जनतेची कामं करत आहोत. त्यासाठी आम्ही सरकार कडे निधी मागत आहे. हे संविधान विरोधी आहेत. विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता. विरोधक असला तरी ठीक पण निवडणुका पुरता विरोधक परत नाही. आमच्या काळात विरोधकांना पण निधी देत होतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मोदींच्या सभेवर भाष्य

एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. मी सहाव्यांदा पुण्यात मेट्रो उद्घाटन करण्याठी येत आहेत. त्याच्या ऑफिसला सांगितले नसेल की आपण एकाच मेट्रो कार्यक्रमाला जात आहेत. हे मोदी याना माहिती नसावं. आम्ही आमच्या मतदरसघातील लोकासाठी आज निधी मागत आहे. अनेक भूखंड बाबत विषय समोर आले आहे,कॅबिनेट ओव्हर रोल करत पुढे ढकलेले जात आहेत. ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नेते जात आहेत. फडणवीस सत्तेत आहे. त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेऊन टाकावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून देवेंद्र फडणवीस यांचे बंदूक धरलेले पोस्टर वायरल होत आहेत. गृहमंत्री आहे देवेंद्रजी असे बॅनर लहान मुलं बघतील काय म्हणतील. देवेंद्र फडवणीस यांनी बंदूक घेऊन यावं. आम्ही संविधान घेऊन येतो. हा बंदुकांचा देश नाही. शाहू फुले आंबेडकर याचा महाराष्ट्र आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.