पुणे : भाजपाने हा रडीचा डाव खेळला. शरद पवार (Sharad Pawar) यावर सगळे बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाहीत तर खूप सिरियस काम करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रत्येक आमदाराने जबाबदारीने मतदान केले. राज्यसभा निवडणुकीतील या पराभवानंतर आता महाविकास आघाडी एक-दोन दिवसात बैठक घेईल. त्यानंतर स्पष्ट होईल, कुठे काय कमी पडेल. आम्ही रोज रिस्क घेतो. ज्या घरात माझा जन्म झाला तिथे मी जेवढे यश बघितले तेवढेच अपयशही बघितले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निवडून आयोगाकडून जे झाले तो बालिशपणा वाटतो. दबाब सगळ्यांवरच आहे. मात्र भाजपातर्फे रडीचा डाव खेळण्यात आला. नबाब मलिक आणि अनिल देशमुख दोषी नसतात त्यांना डांबून ठेवले, असा आरोप त्यांनी केला. तर शेवटी राज्यसभेत विजयी झालेल्या भाजपाचे अभिनंदनही सुप्रिया सुळे यांनी केले. प्रत्येक निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे आम्ही आमचा पराभव स्वीकार करतो. काय चुकले, काय बरोबर याचा विचार केला जाईल. आम्ही कुठे कमी पडलो, याचे चिंतन करू, असे त्यांनी सांगितले.
राज्यसभेच्या या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर संख्याबळ असूनही शिवसेनेच्या संजय पवारांना घरी बसावे लागले. शिवसनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीने 9 मते दिली. ती मते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ यांनी संजय पवारांना दिली होती. तर निकाल यायला रात्री उशिर झाला. त्यासाठी जी हरकत घेतली तो रडीचा खेळ होता, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. राज्यसभेच्या निवडणुकीचा नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवण्याचा अधिकार आहे, त्यात बेकायदेशीर काही नाही. तोच निकाल आयोगाने दिला. त्यासाठी चार तास उशीर झाला, असे शरद पवार म्हणाले.