पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नाही, असा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत असे जरी यशोमती ताई म्हणाले असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. (supriya sule reply yashomati thakur to her serious allegations)
सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन करतानाच यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याचं स्पष्ट केलं. यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केलीय. ते त्यावर विचार करतील, ताईंनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे, मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बालविकास संगोपन निधीसाठी 5 लाख रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने दिला होता. बालविकास संगोपन निधीला आणखी पैशाची गरज असेल तर ती नक्कीच पूर्ण केली जाईल. महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बालकांबाबत संवेदनशील आहेतच. त्यामुळे यशोमतीताईंनी केलेली मागणी नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानावर पुन्हा एकदा भाष्य केलं. आपण जेव्हा सत्तेत असतो तेव्हा विरोधकांनी टीका करणं साहजिक आहे. त्यांनी टीका करत राहो. आम्ही सेवा करत राहणार. त्यांचा या मागचा उद्देश काय आहे, हे त्यांनाच विचारा. आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाहीये, ते बोलले म्हणजे सत्य होत नाहीये, असा पलटवार त्यांनी केला. तसेच मनसेने कुणाशी युती करावी आणि कुणाशी करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असंही त्या म्हणाल्या. (supriya sule reply yashomati thakur to her serious allegations)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 August 2021 https://t.co/RBeYyMZHSb #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021
संबंधित बातम्या:
उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
(supriya sule reply yashomati thakur to her serious allegations)