Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक घेतला पेट, पुण्यातील कार्यक्रमात एकच खळबळ; नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 15, 2023 | 2:36 PM

सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या साडीच्या पदराचा काही भाग जळाला आहे. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली आणि सर्वच जण घाबरून गेले.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक घेतला पेट, पुण्यातील कार्यक्रमात एकच खळबळ; नेमकं काय घडलं?
Supriya Sule
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: पुण्यातील एका कार्यक्रमात पूजा करत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने हा प्रकार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीच तातडीने आग विझवली. सुप्रिया सुळे यांनी स्वत: प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, सुप्रिया सुळे या सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही इजा वा मोठी दुखापत झालेली नाही.

पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला होता. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

हे सुद्धा वाचा

या कार्यक्रमाचं सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मूर्तीसमोरच समई पेटवलेली होती.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत असताना सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर खाली आला. त्यामुळे साडीने लगेच पेट घेतला. पुतळ्याला हार घालणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

यावेळी सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या साडीच्या पदराचा काही भाग जळाला आहे. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली आणि सर्वच जण घाबरून गेले.

दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर सुप्रिया सुळे या पुढील कार्यक्रमाला गेल्या आहेत. सुप्रिया सुळे या आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात अनेक कार्यक्रमांना त्या हजेरी लावणार आहेत.

सुप्रिया सुळे यांचं आवाहन

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली.

आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार.

धन्यवाद