पुणे: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. 125 तासांचं व्हिडीओ फुटेज देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर प्रविण चव्हाण यांनी ते आरोप फेटाळले होते. प्रविण चव्हाण यांनी त्यांचा अशिल तेजस मोरे (Tejas More) याच्यावर गंभीर आरोप केला होता. प्रविण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यांशी टीव्ही 9 मराठीनं संवाद साधला. यावेळी तेजस मोरे यांनी प्रविण चव्हाण यांचे आरोप फेटाळले आहेत. तर, प्रविण चव्हाण यांनी चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील, असं म्हटलं आहे.
प्रतिनिधीचा प्रश्न: नमस्कार, प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयात डिजीटल घड्याळ तुम्ही बसवलं आणि त्यातून शुटींग करण्यात आलं?
तेजस मोरेंचं उत्तर : हा जो त्यांनी माझ्यावर करण्यात आलेला आरोप बेसलेस आहे. अतिशय खोटा आरोप आहे. त्या स्टिंग ऑपरेशनशी माझा काडीचा संबंध नाही. कोणताही पुरावा सादर न करता बेछूट आरोप केलाय,
प्रश्न: प्रविण चव्हाण यांना कधीपासून ओळखता, कोणत्या कामासाठी भेटलेला
उत्तर प्रविण चव्हाण यांना मी जुलै 2021 मध्ये भेटलो होतो. एका खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानंतर माझा त्यांनी जामीन करुन दिला. त्यानंतर माझं आणि त्यांचं ट्युनिंग जमलं होतं. मी त्यांच्याकडे जात असे. ते म्हणायचे की माझं इंग्रजी चांगलं नसल्यानं तुम्ही मला ड्राफ्टिंग करु द्या, असं ते म्हणायचे. मी ड्राफ्टिंग करायचो. मी गिरीश महाजन आणि बीएचआर प्रकरणात ड्राफ्टिंग केलं आहे. माझं कायद्याचं नॉलेज जास्त नसल्यानं मला जबाब नोंदवणे हे सरकारी वकिलाचं काम नसतं हे माहिती नव्हतं.
प्रश्न :तुमचं शिक्षण काय झालंय?
तेजस मोरे: मी बांधकाम व्यवसायिक होतो. आता मला जामीन झाल्यानंतर नवीन व्यवसायाच्या शोधात होतो. प्रविण चव्हाण यांच्या ऑफिसला जात होतो. गिरीश महाजन यांच्या केसमधील फिर्यादी आणि प्रविण चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून मी काम केलं. सरकारी वकील आणि फिर्यादी बोलू शकत नसल्यानं चव्हाण मला मेसेज पाठवायचे आणि मी ते फिर्यादीला पाठवायचो, असं तेसज मोरे म्हणाले.
प्रश्न: गिरीश महाजन प्रकरणातील फिर्यादीला तुम्ही ओळखता का?
गिरीश महाजन प्रकरणातील फिर्यादीला मी ओळखतो, ते आमच्या परिचयातील आहेत, असं तेजस मोरे म्हणाले.या शिवाय प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन मी केलं नसल्याचं देखील मोरे नी स्पष्ट केलं.
हे स्टिंग ऑपरेशन खरं आहे की खोटं आहे हे स्पष्ट झालेलं नाही. या स्टिंगच्या केंद्रस्थानी मी नव्हतो, आरोपांना काही किमंत नव्हतं. 20 फेब्रुवारी 2020 चा एनडीटीव्ही पाहिला तर मनोज तिवारी यांचा व्हिडीओ जारी करण्यात आला होता. ओव्हर लॅपिंग आणि लिप मिक्सींग करुन ते समोर आणलं गेलं, असं प्रविण चव्हाण म्हणाले. तेजस मोरे बद्दल चौकशीत जे समोर येणार आहे ते येणार आहे. रेकॉर्डिंग खरं आहे तर ते सरकारकडे दिलं असतं. त्यांनी दोन ते तीन महिने वेळ वेळ घेतला. या ओव्हर लॅपिंग आणि लिप मिक्सींग करण्यासाठी तो वेळ घेतला गेला. व्हिडीओ सभागृहात देण्यात आले.
तेजस मोरे हा जामीन प्रकरणासाठी आला होता. संवेदनशील प्रकरणात आरोपींना जामीन मिळत नाही. मात्र, मला जर या प्रकरणातून काढल्यास त्यांना जामीन मिळेल, असं वाटत असेल.या प्रकरणातील अनेक बाबी चौकशीत समोर येतील, असं प्रविण चव्हाण म्हणाले.
इतर बातम्या: