पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यांची(TET Exam Scam )व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभर गाजत असलेल्या या घोटाळ्यातील आरोपींना अजूनही अटक केली जात आहे. या घोटाळ्यामुळे शालेय शिक्षण विभागाची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली आहे. या घोटाळ्यात अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या(Pune police) हाती लागले आहेत. या घोटाळ्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही यावर प्रश्न उपस्थित करून चर्चा झाली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (Maharashtra State Examination Council )ही शालेय शिक्षण विभागाला लागलेली कीडच आहे, असे बोलले जात आहे. राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था असून याचाच अनेकांनी गैरफायदा घेतला. यामुळेच टीईटी ; घोटाळा घडला. टीईटी च्या निकालात फेरफार करून अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
टीईटीच्या घोटाळ्यात अनेक महत्त्वाचे मासे गळाला लागले आहेत. आतापर्यंत पुणे पोलिसांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जी.ए.सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक अश्विन कुमार, डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक सौरभ त्रिपाठी, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, शालेय शिक्षण विभागातील तत्कालीन आयएएस उपसचिव सुशील खोडवेकर आदींसह काही कर्मचारी, एजंट यांना अटक केली आहे. मात्र घोटाळेचे नेटवर्क याच्याही पुढे जाईल असे पोलिस यंत्रणांना वाटत आहे. या घोटाळ्यात पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा 2019-20 प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. एकूण 3955 पानी दोषारोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तुकाराम सुपे , सुखदेव ढेरे ,सह 15 आरोपी अटक केली आहे. मात्र अद्यापही घोटाळ्यातील 12 आरोपी फरार आहेत.
टीईटी घोटाळ्याचा विपरीत परिणाम हा परिषदेकडून घेण्यात येनाऱ्या इतर परीक्षांच्यावर झाला आहे. यामुळे अनेक परीक्षार्थींचे नुकसानही झाले आहे. परीक्षा लांबणीवर पडल्याने अनेक परीक्षार्थीं वयोमर्यादेच्या निकष बसता नसल्याचे ही समोर आले आहे. या घोटाळयातील बनावट शिक्षकांना नोकर्यातर गमवाव्य लागणारच आहेत. पण शिष्यवृत्ती परीक्षा रखडली, टायपिंग परीक्षेला निकाल लांबलापरीक्षा घेण्यासाठी नव्या कंपन्यांची शोधाशोध करावा लागत आहे. दुसरीकडं अशासकीय सदस्यांच्या नियुक्तांचा विसर पडला आहे. नवी प्रशासकीय इमारत उभारण्याची चर्चा थांबली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा निरुत्साह निर्माण झाला आहे.
CCTV | टेम्पो रिव्हर्स घेताना महिलेला जबर धडक, वसईत 60 वर्षीय महिला गंभीर जखमी
सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, म्हणाले, ही तर हायकमांडची इच्छा