पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणाची (TET exam scam)व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या गैरव्यवहातील आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन हा मंगळवारी पुणे पोलिसांपुढे (Pune police) हजर झाला. त्यानंतर आता टीईटी परीक्षेत पैसे देऊन पात्र झालेल्या उमेदवारांवर सायबर पोलीस कारवाई करणार आहेत. सायबर पोलिसांनी (cyber police ) केली पैसे देऊन पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली आहे. बनावट शिक्षकांनी तयार केलेली यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने खातरजमा केल्यानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
प्रमाणपत्र केली सील
शिक्षण विभागाने घेतल्या टीईटीची परीक्षा ना देता दीडशे ते दोनशे जणांना परीक्षा पास असल्याचे दिलेली प्रमाणपत्र पोलिसांनी सील केली आहेत. यामुळे शिक्षण विभागातील आणखी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी या तपासातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच काही आरोपींना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांच्याकडे तपास करण्याचे काम थंडावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर पोलिसांनी या तपासाला पुन्हा गती दिली आहे.
आरोपी गणेशन स्वतःहून गैरहजर
जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन हा आज पोलीस आयुक्त कार्यालयात स्वत: हून हजर झाला. त्याने आपल्याला बंगलोर न्यायालयाने आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला असल्याची कागदपत्रे दाखविली आहेत. गणेशन याला यापूर्वी आम्ही चौकशीसाठी हजर झाल्याची नोटीस ई-मेलमार्फत दिली होती. मात्र, त्याने तेव्हा काहीही कळविले नव्हते. गणेशन आज पोलिसासमोर हजर झाले. आपल्याला अटक होईल या भीतीने गणेशन याने बंगलोर न्यायालयात धाव घेतली. आपला या प्रकरणात काही संबंध नाही. आपले म्हणणे पोलिसांसमोर मांडण्याची संधी मिळावी, आपण पोलीस तपासाला सहकार्य करायला तयार आहोत, असे सांगून त्यासाठी पुण्याला जाऊन म्हणणे मांडण्यासाठी अटकपासून संरक्षण देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये असे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.
नितेश राणेंची मध्यरात्रीपासून तब्येत बिघडली, उलट्यांचा त्रास सुरू
Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…
Sanjay Raut | ‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फूलवाल्याला उचललं